मुंबई : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिला टी20 सामना होणार आहे. 3 सामन्यांची टी20 ही सिरीज असणार आहे. विराट कोहलीला विश्रांती दिल्याने रोहित शर्माकडे कर्णधापदाची जबाबदारी आहे. आजच्या सामन्यामध्ये रोहित शर्माकडे रेकॉर्ड करण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिरीजमध्ये रोहितने जर 15 सिक्स मारले तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे होणार आहे. रोहितने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 84 सामन्यात 89 सिक्स मारले आहेत.


आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये ख्रिस गेलने सर्वाधि सिक्स ठोकले आहेत. तर न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गप्टील यांच्या नावावर देखील सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड आहे. दोघांनीही 103 सिक्स ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 पेक्षा अधिक सिक्स दोघांनीच मारले आहेत.


रोहित आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यामध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर 91 सिक्ससह न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम आहे.


टी20 मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे फलंदाज :


103 - ख्रिस गेल (56 सामने)


103 - मार्टीन गप्टील (75 सामने)


91 - ब्रँडन मॅक्यूलम (71 सामने)


89 - रोहित शर्मा (84 सामने)


83 - कॉलीन मुनरो (47 सामने)