नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या रागासाठी ओळखला जातो. विराट कोहली नेहमी संघासाठी काहीतरी चांगल योगदान देत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्डिंग करताना बॉलर तसेच आपल्या फिल्डरला नेहमी प्रोत्साहनही देत असतो. परिस्थितीतही जर खेळाडूने योग्यरित्या फिल्डींग करत नसेल तर विराट खूप चिडतो. भुवनेश्वरकुमारच्या बॉलिंगला ट्रेविस हेडने रोहित शर्माला कॅच दिली होती. पण रोहित ती कॅच पकडू शकला नाही आणि कॅच सुटली.


विराट कोहली रोहितकडे आला आणि त्याने सांगितले की, जर झेल घेता येत नाही तर स्लिपमध्ये का उभे राहावे? जरी विराट कोहलीने हे शब्द हसून म्हटले होते पण हे कोणापासून लपून राहिले नाही. रागाने किंवा विनोदाने म्हटला असला तरी पण विराट हा आपलले म्हणणे समोराच्याला आपल्या शैलीत सांगतोच ही विराटची खासियत म्हणावी लागेल.