Ind Vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये खेळल्या गेलेला दुसरा वनडे सामना टीम इंडिया 8 विकेट्सने जिंकला. या विजयासोबत भारताने वनडे सीरिज 2-0 अशी जिंकली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 109 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 20.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केलं. दरम्यान या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) किती विसरभोळा आहे, याची प्रचिती प्रेक्षकांना आली.


टॉसदरम्यान रोहित शर्मा झाला कन्फ्यूज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉसदरम्यान कर्णधार रोहित शर्माने नाणं उडवलं, यावेळी  टॉम लेथम ने हेडचा कॉल दिला आणि टेल आल्याने तो टॉस हरला. अशावेळी टॉस जिंकल्याने रोहित शर्माला प्रथम निर्णय विचारण्यात आला होती. मात्र यावेळी त्याने निर्णय सांगण्यासाठी तब्बल 20 मिनिटं घेतली आणि आपला निर्णय घेतला. गोलंदाजीचा निर्णय सांगण्यासाठी रोहितने इतका वेळ घेतला की टॉम आणि तिथे उपस्थित रवी शास्त्री जोरजोरात हसत होते.


कन्फ्यूज झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "मी विसरून गेले होतो, टॉस जिंकल्यानंतर मला नेमकी कशाची निवड करायची आहे. कारण यावर भरपूर चर्चा केली होती." दरम्यान या वरून रोहित शर्माला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.



रोहित शर्माची कॅप्टन इनिंग


शनिवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने 50 बॉल्समध्ये रन्सची खेळी केली. यामध्ये कर्णधाराने 7 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश आहे. तर शुभमन गिलने 53 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली देखील मैदानात उतरला होता. मात्र अवघ्या 11 रन्सवर त्याला माघारी परतावं लागलं.


दरम्यान रोहित शर्माच्या या विसरभोळेपणावरून लोकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं आहे. अशातच रोहितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक खेळाडू मैदानात खेळायला उतरतोय आणि ग्लोज घालतोय. मात्र यावेळी तो बॅट घ्यायलाच विसरल्याचं दिसतंय. याच्या कॅप्शनमध्ये तो रोहित शर्मा असल्याचं म्हटलंय. मात्र हा खेळाडू रोहित शर्मा नसून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे.