Rohit Sharma : एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशाने टीम इंडियाचा ( Team India ) 6 रन्सने पराभव केला आहे. भारताचा हा एशिया कपमधील पहिला पराभव आहे. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये एका खेळाडूवर पराभवाचं खापर फोडलं आहे. मात्र यापूर्वीच टीम इंडियाने एशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. 


पराभवानंतर संतापला रोहित शर्मा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले होते. मात्र टीम इंडियाने केलेला हा प्रयोग फसलेला दिसून आला. सुपर - 4 मध्ये शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशाकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) संतापला होता.


सामन्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला, "आम्ही एक मोठं लक्ष्य समोर ठेऊन खेळाडूंना काही वेळ देऊ इच्छित होतो. अक्षर पटेलने चांगली फलंदाजी केली मात्र तो जिंकवून देऊ शकला नाही. याचे श्रेय बांगलादेशच्या गोलंदाजांना जातं. हा सामना आम्ही कसा खेळला, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अक्षर पटेलने त्याचा खेळ दाखवला मात्र तो सामना फिनिश करू शकला नाही."


रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, गिलचं शतक उत्तम होतं. मुळात त्याला माहितीये कसं खेळायचं आहे. त्याला टीमसाठी काय करायचंय आहे याबाबत तो स्पष्ट आहे. नवीन बॉलविरूद्ध गिल खूप चांगली कामगिरी करतो. 


शुभमन गिलचं शतक व्यर्थ्य 


बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांची विकेट घेतल्यानंतर शुभमन ( Shubman Gill ) एकटा नडला. शुभमन गिलने यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. बांगलादेशने दिलेल्या २६६ धावांचं आव्हान पार करताना भारताची फलंदाजी डगमगली. मात्र टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिला मात्र एका बाजूने किल्ला लढवत होता. या सामन्यामध्ये गिलने 133 बॉल्समध्ये 121 रन्सची खेळी केली. यामध्ये 8 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता.