T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरूद्ध सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची धार दिसून आली. अर्शदीप आणि हार्दिक पांड्याच्या (Arshdeep and Hardik) भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पहायला मिळालं. मात्र, या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्शदीप सिंगने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोन्ही सलामीवीरांना बाद करत भारताला चांगली सुरवात करून दिली. शान मसूद (Shan Masood) आणि इफ्तिखार अहमद यांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला सावरलं. त्यानंतर शमी आणि हार्दिक पांड्याने गोलंदाजीची धार दाखवत आणखी तीन खेळाडू तंबूत पाठवले.


त्यानंतर रोहितने अनुभवी आश्विनकडे बॉल पाठवला. आश्विनने टाकलेल्या 15 व्या षटकात शान मसूदने सरळ हवेत एक फटका मारला पण चेंडू स्पायडर कॅमला (Spider Cam) लागला. त्यावेळी मसूद 31 धावांवर खेळत होता. जर बॉल स्पायडर कॅमला लागला नसता तर हार्दिक पांड्याच्या हातात बॉल गेला असता आणि भारताला 6 वी विकेट मिळाली असती.


पाहा व्हिडीओ - 



दरम्यान, बॉल हिट केल्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज धावा घेत होते. त्यावरून रोहित शर्मा संतापला आणि डेड बॉल घोषित करा, अशी मागणी केली. त्यावर अंपायर्सने अखेर डेड बॉल घोषित केलाय. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्ताने 20 षटकात 159 धावा केल्या आहेत. त्यानंतर आता भारतीय संघ 160 धावांचा पाठलाग करताना दिसत आहे.