कट्टक : भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला. रोहितने या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिलेय. तसेच धोनीचेही त्याने तोंडभरुन कौतुक केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या क्रमांकावर खेळण्यास आल्यानंतर डेथ ओव्हरमध्ये आवश्यक धावसंख्या वाढण्यास धोनीने मोलाची मदत केली. यामुळे रोहितने धोनीचे कौतुक केलेय.


रोहित  म्हणाला, लोकेश राहुलने अव्वल स्थानावर चांगली फलंदाजी केली तर धोनी आणि मनीष पांडेने शेवट चांगला केला. धोनीला खरच तोड नाही. त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा फायदा झाला. त्याने अनेक सामने जिंकून दिलेत आणि मला वाटते की चौथा क्रमांक त्याच्यासाठी आदर्श आहे. 


या सामन्यात भारत टॉस हरला होता. याबाबत बोलताना रोहित म्हणाला, टॉसमुळे सामन्यावर फारसा काही फरक पडला नाही. आम्हाला विश्वास होता की सामना पूर्ण ४० षटकांचाच होईल आणि अखेरपर्यंत काही बदलले नाही. दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे नव्हते. 


यावेळी रोहितने युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या स्पिनर जोडीचेही कौतुक केले.