World Cup : रोहित शर्माने रचला इतिहास, सचिन-सेहवागनंतर `ही` कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय ओपनर
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळवले आहे, जे आतापर्यंत केवळ महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग भारतासाठी मिळवू शकले आहेत.
Rohit Sharma Record : टीम इंडियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज 'हिटमॅन' रोहित शर्माने रविवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यात इतिहास रचला आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळवले आहे. जे आतापर्यंत केवळ महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग भारतासाठी मिळवू शकले आहेत. 'हिटमॅन' रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत.
रोहित शर्माने रचला इतिहास
रविवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने १२ धावा करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्याच्या तिसऱ्याच षटकात रोहित शर्माने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो केवळ तिसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. रोहित शर्मापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी हा पराक्रम केला होता.
भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा
माजी तुफान फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. भारताकडून सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवागने सर्वाधिक 15,758 धावा केल्या आहेत. या महान खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने भारतासाठी सलामीवीर म्हणून 15,335 धावा केल्या आहेत. या यादीत 'हिटमॅन' रोहित शर्माचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने भारताकडून सलामीवीर म्हणून 14,047 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय सलामीवीर
1. वीरेंद्र सेहवाग - 15,758
2. सचिन तेंडुलकर - 15,335
३. रोहित शर्मा - १४,०४७*
4. सुनील गावस्कर - 12,258
5. शिखर धवन – 10,867
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर
1. सनथ जयसूर्या - 19,298
2. ख्रिस गेल - 18,867
3. डेव्हिड वॉर्नर - 18,026
4. ग्रॅम स्मिथ - 16,950
5. डेसमंड हेन्स - 16,120
6. वीरेंद्र सेहवाग - 16,119
7. सचिन तेंडुलकर - 15,335