BAN vs IND: भारत आणि बांगलादेश (BAN vs IND) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज (ODI Series) खेळवली जाणार आहे. रविवारी म्हणजेच उद्यापासून या सिरीजला सुरुवात होणार आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. दरम्यान सामन्याच्या पूर्वी कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली. यावेळी रोहितने आगामी वर्ल्डकपबाबत (world cup 2023) मोठे संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वर्ल्डकप 2023 संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहितने स्पष्टपणे काही सांगितलं नाही, मात्र आत्ता पुढचा विचार करून काही बिघडवायचं नाहीये.


यावेळी रोहित शर्मा म्हणाला, प्रत्येक वेळी तुम्ही सामना खेळता तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तयार असता. वर्ल्डकप 2023 ला अजून 8-9 महिने बाकी आहेत. त्यामुळे आम्हाला खूप पुढचा विचार करून आताच्या गोष्टी बिघडवायच्या नाहीत. 


रोहित पुढे म्हणाला, "सध्या आम्ही टीम म्हणून कोणत्या मुद्द्यांवर टिकून राहायचं याचा विचार करतोय. मला आणि कोचला माहित आहे की, आम्हाला नेमकं काय करायचंय."


कसा असेल बांगलादेश दौरा?


पहिली वनडे- 4 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
दूसरी वनडे- 7 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
तीसरी वनडे- 10 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
पहली टेस्ट- 14 से 18 डिसेंबर, सकाळी साडे 9 वाजता
दूसरी टेस्ट- 22 से 26 डिसेंबर, सकाळी साडे 9 वाजता


बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडिया


वनडे टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकुर , मो. शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल


टेस्ट टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव