मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये रोहित शर्मा २० बॉल्समध्ये २७ रन्स करून आऊट झाला. या मॅचमध्ये रोहित शर्मा स्वस्तात आऊट झाला असला तरी त्यानं या मॅचमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. रोहित शर्मा एका आंतरराष्ट्रीय टी-20 सीरिजमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा कॅप्टन बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या या सीरिजमध्ये रोहितनं ११ सिक्स लगावल्या आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन ग्रॅम स्मिथच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. स्मिथनं २००९मध्ये इंग्लंडविरुद्ध एका टी-20 सीरिजमध्ये १० सिक्स मारल्या होत्या. 


एका वर्षात सर्वाधिक सिक्स


यंदाच्या वर्षात रोहित शर्मानं सर्वाधिक सिक्स मारण्याच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहितनं यावर्षी वनडेमध्ये ४६, टी-20मध्ये १६ सिक्स आणि टेस्टमध्ये ३ सिक्स अशा मिळून ६५ सिक्स मारल्या आहेत.


याआधी २०१५ साली दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं एका वर्षात ६३ सिक्स, वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलनं २०१२ साली ५९ सिक्स तर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसननं २०११साली ५७ सिक्स लगावल्या होत्या.


लंकेविरुद्ध सर्वाधिक सिक्स


२०१७ या वर्षामध्ये रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्ध ३८ सिक्स लगावल्या आहेत. एका टीमविरुद्ध एकाच वर्षात एवढ्या सिक्स लगावण्याचा हा विश्वविक्रम आहे. याआधी क्रिस गेलनं २०१२साली न्यूझीलंडविरुद्ध ३३ सिक्स मारल्या होत्या.


२०१७मध्ये सर्वाधिक शतकं मारणारा दुसरा खेळाडू


रोहित शर्मा २०१७ या वर्षामध्ये सर्वाधिक शतकं मारणारा दुसरा खेळाडू बनला आहे. या वर्षात रोहित शर्मानं ८ शतकं लगावली आहेत. या यादीमध्ये ११ शतकांसह विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर हशीम आमला, स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरनं ६ शतकं लगावली आहेत. शिखर धवनला या वर्षात ५ शतकं लगावता आली.