इंदूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ५ वनडेच्या सीरिजमध्ये ३-०ची आघाडी घेतली आहे. या विजयाबरोबरच भारत वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पांड्या. रोहितनं ६२ बॉल्समध्ये ७१ रन्स केले तर अजिंक्य रहाणेनं ७६ बॉल्समध्ये ७० रन्स केले. रोहित आणि अजिंक्यनं पहिल्या विकेटसाठी १३९ रन्सची पार्टनरशीप केली.


चौथ्या क्रमाकांवर बॅटिंगला आलेल्या हार्दिक पांड्यानं ७२ बॉल्समध्ये ७८ रन्सची खेळी केली. पांड्याच्या या खेळीमध्ये ५ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. यामुळे भारतानं ४७.५ ओव्हरमध्ये पाच विकेट गमावून २९४ रन्स करून विजय मिळवला.


या मॅचमध्ये रोहित शर्मानंही उत्तूंग अशा चार सिक्स मारल्या. पॅट कमिन्सच्या शॉर्ट बॉलवर रोहित शर्मानं लॉन्ग लेगवर पहिला सिक्स मारला. 



तर नॅथन कुल्टर नाईला पुढच्याच ओव्हरमध्ये रोहितनं लॉन्ग ऑफवर सिक्स मारला. 



केन रिचर्डसनच्या बॉलिंगवर रोहितनं १०३ मीटर लांब सिक्स मारला. रोहितचा हा सिक्स स्टेडियमबाहेरच गेला. अखेर अंपायरना वेगळा बॉल मागवायला लागला. 



अॅश्टन अगरच्या बॉलिंगवर रोहितनं चौथा सिक्स मारला आणि ४२ बॉल्समध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. वनडे क्रिकेटमधलं रोहितचं हे ३३वं अर्धशतक होतं.