Rohit Sharma imitated Shreyas Iyer Action : मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळवला जात आहे. विराट कोहलीच्या 50 व्या शतकामुळे हा सामना सर्वांच्या लक्षात राहिलचं. मात्र, या सामन्यात श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) योगदान देखील महत्त्वाचं राहिलंय. शुभमन गिल रिटायर्ड हर्ट (Retired hurt) झाला. त्यामुळे श्रेयस अय्यरला मैदानात यावं लागलं. मात्र, मैदानात उतरल्यावर अय्यरने वादळी खेळी केली अन् 67 बॉलमध्ये शतक ठोकलं. श्रेयसच्या शतकाची चर्चा झाली नाही. मात्र, रोहित शर्माचा एक भन्नाट व्हिडीओ (Rohit Sharma Viral Video) व्हायरल झालाय. कॅप्टन रोहित शर्मा ड्रेसिंग रूममधून बाहेर येताना श्रेयसची नक्कल करताना दिसला. त्याची हा व्हिडीओ सध्या तुफान ट्रेंडिंगमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. रोहित आणि गिलने चांगली सुरूवात करू दिल्यावर विराट आणि श्रेयसने सुत्र हातात घेतली अन् दोघांनी शकतं ठोकली. श्रेयस अय्यरने 67 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण केल्यानंतर हेलमेट काढून श्रेयसने उत्साह साजरा केला. त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये असलेला रोहित बाहेर आला अन् श्रेयस अय्यरची नक्कल केली. त्यावेळी त्याच्या मागे असलेल्या कुलदीप यादव अन् विराट कोहलीला देखील हसू आवरलं नाही.



न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.