Rohit Sharma Injury : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; प्रॅक्टिसदरम्यान कर्णधार रोहितला दुखापत
Rohit Sharma Injury : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टीम इंडियाला एकादिवसापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.
Rohit Sharma Injury : बुधवारी म्हणजेच 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाला एकादिवसापूर्वीच एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma ) दुखापत झाल्याने चिंता वाढली आहे. प्रॅक्टिसदरम्यान हिटमॅनला ही दुखापत झाल्याचं समोर आलंय.
बुधवारपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 दिवसांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनलला सुरुवात होणार आहे. यावेळी संपूर्ण टीम इंडिया ( Team India ) तयारी करत असून फलंदाजी देखील नेट्समध्ये प्रॅक्टिस करतायत. नेट्समध्ये फलंदाजी करत असतानाच टीम इंडियाचा फलंदाज रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दुखापतग्रस्त झाला आहे.
रोहित शर्मा होणार WTC Final मधून बाहेर?
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेट्समध्ये फलंदाजी करत असताना बॉल थेट त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. यानंतर हिटमॅनचा एका फोटो देखील व्हायरल होतोय. या फोटोमध्ये कर्णधार अंगठ्यावर मलमपट्टी होताना दिसतेय.
काही रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माची ( Rohit Sharma ) दुखापत इतकी गंभीर आहे की त्याला प्रॅक्टिस सेशन सोडून जावं लागलं. मात्र रोहितची ( Rohit Sharma ) दुखापत किती गंभीर आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. हिटमॅनची दुखापत जर गंभीर असेल तर त्याला बाहेर बसावं लागू शकतं. असं झाल्यास भारतासाठी हा मोठा धक्का असू शकतो.
रोहितच्या अनुपस्थितीत कोण करणार कॅप्टन्सी?
रोहितला ( Rohit Sharma ) झालेल्या दुखापतीवरून असा प्रश्न उपस्थित होतोय की, रोहितच्या अनुपस्थितीत टीमचं ( Team India ) कर्णधारपद कोणाच्या हाती जाणार? रोहित शर्माची ( Rohit Sharma ) दुखापत गंभीर असल्यास तो टीमबाहेर गेला तर टीमची धुरा अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) हाती देण्यात येऊ शकते. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) वरिष्ठ खेळाडूंविना 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सिरीज जिंकली होती. त्यामुळे अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा अंतिम सामना ( ICC World Test Championship ) खेळावा लागू शकतो.