India vs New Zealand T20 : रोहित शर्मासाठी खास सामना, नावावर होणार `हा` मोठा विक्रम
कर्णधार झाल्यानंतर आपल्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर जमा होणार विक्रम
मुंबई : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा पहिला टी-20 सामना (India vs New Zealand T20 Series) आज जयपूरमध्ये (Jaipur) खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना खास असणार आहे. कारण या सामन्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) पर्वाला सुरुवात होणार आहे.
पहिल्याच सामन्यात रोहित शर्मासमोर मोठं आव्हान असणार आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup 2021) किवी आर्मीने टीम इंडियाचा (Team India) 8 विकेटने दणदणीत मात केली होती. या पराभवाला काही दिवस होत नाही तोच भारत आणि न्यूझीलंड पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकले आहेत. या पराभवचा वचपा काढण्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे.
पहिला सामना रोहितसाठी खास
विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय टी20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून खेळणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर या सामन्यात एक अनोखा विक्रम जमा होणार आहे.
रोहित होणार सिक्सर किंग?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 सिक्सचा टप्पा गाठण्यापासून रोहित शर्मा अवघी तीन पावलं दूर आहे. हा विक्रम केला तर रोहित शर्मा भारताचा पहिला आणि क्रिकेट जगतातला तिसरा फलंदाज ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत 447 सिक्सची नोंद आहे.
रोहितच्या पुढे कोण?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम वेस्ट इंडिजच्या (West Indies) ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे. त्याने आतापर्यंत 553 सिक्स लगावले आहेत. तर पाकिस्तानचा (Pakistan) माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रीदीच्या (Shahid Afridi) नावावर 476 स्किस जमा आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले सिक्सर किंग
1 - ख्रिस गेल - 553 सिक्स (वेस्टइंडीज)
2 - शाहिद अफरीदी - 476 सिक्स (पाकिस्तान)
3 - रोहित शर्मा - 447 सिक्स (भारत)
4 - ब्रँडन मैक्युलम - 398 सिक्स (न्यूझीलंड)
5 - मार्टिन गुप्टिल - 359 सिक्स (न्यूझीलंड)
6 - एमएस धोनी - 359 सिक्स (भारत)