नवी दिल्ली : १३ नोव्हेंबर २०१४ रोजी टीम इंडियाचा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याने क्रिकेटविश्वात एक इतिहास रचला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकातामधील ईडन गार्डन मैदानात श्रीलंकेविरोधात खेळताना रोहित शर्माने एक जबरदस्त इनिंग खेळली. अशा प्रकारे एखादा क्रिकेटर इनिंग खेळेल असा विचारही कुणी केला नसेल.


रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये मोठा स्कोर उभा करत २६४ रन्सची इनिंग खेळली. यासोबतच डबल सेंच्युरी लगावणारा रोहित जगातील पहिला क्रिकेटर बनला.


या मॅचमध्ये रोहित शर्मा ४ रन्सवर खेळत असताना श्रीलंकन क्रिकेटर थिसारा परेराने त्याची कॅच ड्रॉप केली. त्यानंतर रोहितने जबरदस्त बॅटिंग करत या मॅचमध्ये ३३ फोर आणि ९ सिक्सर लगावत २६४ रन्स केले.


विशेष म्हणजे रोहितने सेंच्युरी तितक्याच बॉल्समध्ये केली. मात्र, त्यानंतर १६४ रन्स रोहितने केवळ ७३ बॉल्समध्ये केले. रोहितच्या हाताला दुखापत झाली होती त्यानंतर रोहितने कमबॅक करत हा रेकॉर्ड केला. यापूर्वी रोहितने २०९ रन्स वन-डे मॅचमध्ये बनवले होते.


रोहितपूर्वी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवण्याचा रेकॉर्ड विरेंद्र सेहवागच्या नावावर होता. सेहवानगने इंदूरमध्ये वेस्ट इंडिज विरोधात २१९ रन्स बनवले होते.


वन-डे क्रिकेटमध्ये सर्वातआधी डबल सेंच्युरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लगावली होती. ग्वालियरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळताना सचिनने हा रेकॉर्ड केला होता. तर, महिला क्रिकेटर बेलिंडा क्लार्कने १९९७ मध्ये २२९ रन्स बनवले होते.