मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पराभूत झाल्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीला खूप ट्रोल करण्यात आलं. त्याच्या हट्टी निर्णयांमुळे टीम इंडियाचा पराभव झाला असाही दावा अनेक बड्या खेळाडूंनीही केला. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबईच्या रोहित शर्माला टीम इंडियाचं कर्णधार पद द्या अशी एकच मागणी सोशल मीडियावर होऊ लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा माजी स्पिन बॉलर मॉन्टी पनेसर याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीबाबत मोठं विधन केलं आहे. पनेसरच्या म्हणण्यानुसार टीम इंडियाचं कर्णधार पद टी 20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडे द्यायला हवं असं मला वाटतं.


क्रिकबाउंसरशी बोलताना पनेसर म्हणाला मला असं वाटतं की मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याने कर्णधारपद खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलं आहे. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे द्यायला हवं.


टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून UAEमध्ये खेळवला जाणार आहे. T 20 वर्ल्ड कपचे सामने IPL फायनलच्या काही दिवसानंतर  सुरू होईल. आयपीएलचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. सुपर 12 मध्ये एकूण 30 सामने खेळवले जाणार आहेत. 23 ऑक्टोबरपासून हे सामने सुरू होतील. यामध्ये 6-6 अशी दोन ग्रूपमध्ये विभागणी असेल. हे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह इथे खेळवले जाणार आहेत. 


रोहित शर्माने आपल्या नेतृत्वामध्ये आयपीएलमध्ये मुंबई संघाला 5 वेळा जिंकवून दिलं आहे. मुंबई संघ आयपीएलमध्ये 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020मध्ये ट्रॉफी जिंकली आहे. तर आतापर्यंत आरसीबीने एकदाही ही ट्रॉफी कोहलीच्या नेतृत्वामध्ये जिंकलेली नाही. त्यामुळे सर्वांनाच आता कोहली ऐवजी मुंबईचा रोहित शर्मा कर्णधार म्हणून हवा असल्याची सोशल मीडियावर मागणी होत आहे.