नवी दिल्ली : टीम इंडियाचा उपकर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्माने गेल्या टी-२० मध्ये शानदार फलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात मोठा सहभाग नोंदवला. तो सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या दुस-या टी-२० मध्ये रोहित हे रेकॉर्ड करू शकतो. पहिल्या टी-२ मध्ये शिखर धवन आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी १५८ रन्सची भागीदारी करत नवा रेकॉर्ड कायम केला होता. आता रोहित कोणते रेकॉर्ड करू शकतो हे पाहुया...


रोहित शर्मा टी-२० फॉर्मेटमध्ये १५०० रन्स बनवण्याच्या फारच जवळ आहे. तो या रेकॉर्डपासून केवळ २८ रन्स दूर आहे. रोहित शर्मा ज्याप्रकारे फॉर्ममध्ये आहे. त्यानुसार तो राजकोटमध्ये २८ रन्स सहज करू शकतो. हा रेकॉर्ड केल्यास तो टीम इंडियाचा दुसरा खेळाडू बनेल. त्याच्याआधी हा रेकॉर्ड विराट कोहली याने केला आहे. 


रन्सच्या बाबतीत रोहित शर्मा ब्रेंडन मॅक्कुलमच्या बराच मागे भलेही असो पण सिक्सर लगावण्याच्या बाबतीत एबी डिविलियर्ससाठी धोका बनला आहे. रोहित शर्मा टी-२० मध्ये आतापर्यंत ५६ सिक्सर लगावले आहे. डिविलियर्सची बरोबरी करण्यासाठी रोहितला ४ आणाखी सिक्सर गरजेचे आहेत. जर त्याने या सामन्यात ५ सिक्सर लगावले तर तो डिविलियर्सला मागे सोडेल. 


रोहित शर्मा टी-२० मध्ये एक आणखी रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. सलामी फलंदाज म्हणून त्याने आतापर्यंत ३० खेळींमध्ये ९२६ रन्स केले आहेत. त्याला १ हजार रन्स पूर्ण करण्यासाठी ७४ रन्सची गरज आहे. जर या सामन्यात तो खेळला तर हा नवा रेकॉर्डही त्याच्या नावावर होईल.