ना अँडरसन ना ब्रेट ली, Rohit Sharma `या` बॉलरला घाबरायचा; म्हणाला `मी 100 वेळा त्याचे व्हिडीओ बघायचो पण...`
Rohit Sharma names toughest bowler : क्रिकेटचा हिटमॅन सध्या प्रसिद्धीच्या नव्या उंचीवर आहे. 17 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर देखील त्याची भूक कमी झाली नाही. मात्र, तुम्हाला माहिती का? रोहित शर्मा कोणत्या बॉलरला खेळायला घाबरायचा? त्याने स्वत:च खुलासा केलाय.
Rohit Sharma On Dale Steyn : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये संघाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा गेली 17 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतोय. रोहित शर्माने अनेक गोलंदाजांना भरदिवसा आकाशातील तारे दाखवलेत आणि अजूनही गोलंदाजांच्या बत्या गुल करतोय. मात्र, रोहित शर्मा एका गोलंदाजाला (Rohit Sharma names toughest bowler) खेळताना घाबरायचा. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माने याचा खुलासा केला.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
तुला भिती वाटणारा असा गोलंदाज कोण आहे? ज्याला खेळताना तुला कढीण जातं? असा सवाल जेव्हा रोहित शर्माला विचारला गेला, तेव्हा त्याने दिलखुलास उत्तर दिलं. रोहित शर्माने यावेळी साऊथ अफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन याचं नाव घेतलं. डेल स्टेन एक महान गोलंदाज होता. त्याचा वेगच नाही तर त्याची स्विंग देखील खूपच घातक असायची. मी बॅटिंगला जाण्याआधी त्याचे व्हिडीओ 100 वेळा पहायचो. जो खऱ्या अर्थाने महान गोलंदाज आहे. वेगात बॉल करताना स्विंग करण्याची ताकद खूप कमी गोलंदाजांकडे असते, त्याच डेल स्टेन अव्वल होता.
डेल स्टेन 140 च्या स्पीडने बॉलिंग करायचा आणि त्याकडे त्या स्पीडने बॉल स्विंग करण्याची कला होती. त्याचे बॉल बॅटवर वेगाने येत होते. मला त्याच्या विरोधात खुप चांगली कामगिरी करता आली नाही, पण मी त्याच्याविरुद्ध खेळणं एन्जॉय केलं, असंही रोहित शर्मा म्हणाला आहे.
तुम्हाला माहिती का?
रोहित शर्मा जरी डेल स्टेनला आव्हानात्मक मानत असला तरी रोहित डेल स्टेनविरुद्ध फक्त एकदाच आऊट झालाय. ते ही टेस्ट क्रिकेटमध्ये... 2013 मध्ये बॉक्सिंग डे टेस्टमध्ये डेल स्टेनने रोहित शर्माला शुन्यावर बाद केलं होतं.
दरम्यान, रोहित शर्माने या सिझनमध्ये झॅक क्रॉउलीचं कौतूक केलं. मी या सीझनमध्ये झॅक क्रॉउलीला खूप जवळून पाहिलं आणि त्याला फलंदाजी करताना बघायला मजा आली. मी स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीचा आनंद लुटला, जरी तो इतरांपेक्षा वेगळा आहे, मला असं म्हणायचं आहे की त्याला मिडल ऑर्डरमध्ये गोष्टी हाताळण्याची स्वतःची पद्धत आहे परंतु तो यशस्वी आहे, असं रोहित शर्मा म्हणतो.