Rohit Sharma : वडापाव नाही तर `हे` आहे रोहितचं फेवरेट फूड; इंटरव्यूमध्ये स्वतः केला खुलासा
Rohit Sharma : अनेकदा यावरून हिटमॅनला ट्रोलही करण्यात येतं. नुकतंच रोहित शर्माचा एक इंटरव्ह्यू झालाय. या इंटरव्ह्यूमध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या फेवरेट डीशबद्दल खुलासा केला आहे.
Rohit Sharma : मुंबईकरांना वडापाव ( Vada Pav ) म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. वडापाव ही मुंबईकरांची जणू एक ओळखच आहे. टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील वडापावचा खूप मोठा फॅन असल्याचं म्हटलं जातं. अनेकदा यावरून हिटमॅनला ट्रोलही करण्यात येतं. नुकतंच रोहित शर्माचा एक इंटरव्ह्यू झालाय. या इंटरव्ह्यूमध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या फेवरेट डीशबद्दल खुलासा केला आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत ( Ind Vs Aus ) यांच्यात सामना खेळवला जातोय. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma ) पहिल्या 2 सामन्यांमध्ये आराम देण्यात आलाय. 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये रंगणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार आहे. यामध्येच रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रोहितने ( Rohit Sharma ) त्याची फेवरेट डीश सांगितली आहेय
आवडत्या खाण्याबाबत रोहित शर्माचा खुलासा
चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी भरपूर इच्छा असते. अनेक चाहते खेळाडूंची जीवनशैली खूप फॉलो करतात. रोहित ( Rohit Sharma ) त्याच्या फिटनेसबाबत अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होतो. या ठिकाणी त्याला वडा पाव ( Vada Pav ) या नावाने ट्रोल करण्यात येतं.
लोकांचा समज असा आहे की, रोहितला ( Rohit Sharma ) वडापाव प्रचंड आवडतो. कदाचित तुम्हालाही असं वाटत असेल. मात्र हा दावा साफ खोटा आहे. हे आम्ही नाही तर खुद्द कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय. रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
एका स्पोर्ट्स जर्नलिस्टला उत्तर देताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, आम्ही काही वेगळं खाणं खात नाही. जे सामान्य लोकं जेवतात, ते पदार्थ आम्ही खातो. मला डाळ-भात प्रचंड आवडतो. मुळात डाळ भात सर्व ठिकाणी सहजरितीने उपलब्ध असतो. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला डाळ ही मिळणारच.