Rohit Sharma on KL Rahul: गेल्या 10 वर्षात टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाबाबत (Vice Captain of Team India) अनेक नाव समोर आली आणि गेली. मात्र, टीम इंडियाला (Team India) एखादा खंदा खेळाडू टिकू शकेल, असा उपकर्णधार मिळालच नाही. आत्ताही संघाचा उपकर्णधार केएल राहूल (KL Rahul) याच्याबाबत चित्र स्पष्ट नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेत राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता त्यावर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मोठं वक्तव्य केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मागील काही सिरीजमध्ये त्याला उत्तम कामगिरी करता आली नाही. तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर सिरीजच्या (Border Gavaskar Series) पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये राहूल फेल गेल्याचं दिसून आलंय. अशातच आता रोहितने (Rohit Sharma On KL Rahul) राहुलची पाठराखण केल्याचं पहायला मिळतंय.


काय म्हणाला रोहित शर्मा?


मी मागच्या सामन्यानंतर देखील बोललो होतो की, ज्यावेळी एखादा खेळाडू कठीण काळातून जात असतो, त्यावेळी त्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे. त्यावेळी उपकर्णधार आहे किंवा नाही हे आपल्याला काही सुचित करत नाही. त्यावेळी त्याला उपकर्णधार केलं गेलं, त्यावेळी तो कदाचित संघातील वरिष्ठ खेळाडू असेल. त्याचं उपकर्णधारपद काढून टाकणं हे काहीही सूचित करीत नाही, असं रोहित शर्मा (Rohit Sharma on KL Rahul) म्हणाला आहे.



आणखी वाचा - ना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...


दरम्यान, राहुलकडे यातून बाहेर पडण्यासाठी गुणवत्ता आहे. त्यामुळे आम्ही राहुलच्या पाठीशी आहोत. तो नक्की कमबॅक करेल, असा विश्वास कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid On KL Rahul) व्यक्त केलंय. तर दुसरीकडे राहुलच्या जागेवर वेगळवेगळी नावं माजी क्रिकेटर्सकडून सुचवण्यात येत आहे. त्यामुळे आता राहुलचं पद कायमचं जाणार की राहणार? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.