Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो `एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...`
Rohit Sharma On Viral Video : टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टार स्पोर्टसच्या (star sports) कॅमेरामॅनवर नाराजी व्यक्त केलीये.
Rohit Sharma Post For Viral Video : काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या अभिषेश नायरसोबत बोलताना रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक ऑडियो लीक झाला होता. याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा कॅमेरामॅनला हात जोडून विनंती करताना दिसला. आमचं बोलणं रेकॉर्ड करू नको, अशी विनंती रोहित शर्माने केली होती. मात्र, तरी देखील व्हिडीओ व्हायरल झाल्याने रोहित संतापल्याचं पहायला मिळालंय. रोहितने सोशल मीडियावर पोस्टकरून (Rohit Sharma Post) नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
क्रिकेटपटूंचं जीवन इतकं अनाहूत बनलं आहे की कॅमेरे आता आम्ही आमच्या मित्र आणि सहकाऱ्यांसोबत, प्रशिक्षणात किंवा सामन्याच्या दिवशी गोपनीयतेत करत असलेले प्रत्येक पाऊल आणि संभाषण रेकॉर्ड करत आहेत, असं म्हणत रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
स्टार स्पोर्ट्सला माझं संभाषण रेकॉर्ड करू नका असे सांगूनही त्यांनी गोपनीयतेचा भंग करणारं संभाषण रेकॉर्ड केलं अन् नंतर प्रसारित केलं गेलं, असं म्हणत रोहितने संताप व्यक्त केला आहे. नवीन कंटेन्ट मिळवण्यासाठी आणि व्ह्युज आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात. पण या गोष्टीमुळे एक दिवस चाहते, क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विश्वासाला तडा जाईल, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
दरम्यान, रोहित शर्माने व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मैदानावर असताना देखील रोहितचं संभाषण व्हायरल होत असतं. अशातच खेळाडूंच्या प्रायव्हसीचा भंग होताना अनेकदा दिसतो. विराटच्या बाबतीत देखील अशा घटना झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता रोहित शर्माने खरमरीत पोस्ट केल्याने आता त्याची चर्चा होताना दिसत आहे.