Rohit Sharma on Suryakumar yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नुकंतच 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली. दरम्यान टीम इंडियाला (Team India) टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर वनडे सिरीजमध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या तिन्ही सामन्यामध्ये टी-20 फॉर्मेटचा नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) पूर्णपणे फेल ठरलेला दिसला. या संपूर्ण सिरीजमध्ये त्याला एकंही रन करता आला नाही. सूर्यकुमारच्या या परफॉर्मन्सवर आता रोहित शर्माने (Rohit Sharma) मौन सोडलं आहे. 


तिन्ही सामन्यात सूर्या शून्यावर बाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी तिसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सूर्याच्या तुफान खेळीची टीम इंडियाला गरज होती. टीम इंडियाला विजयासाठी सूर्या मोठी आणि टीमला जिंकवून देण्याची खेळी करेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र आल्यावर सूर्या पहिल्याच बॉलवर सूर्या बोल्ड झाला. दरम्यान स्वतःची विकेट गेल्यानंतर सूर्याही फार हताश झालेला दिसला. सूर्याचा सलग तिसरा सामना होता, ज्यामध्ये सूर्या तिसऱ्या बॉलवर आऊट झाला.


सूर्याबाबत Rohit Sharma ने सोडलं मौन


तिन्ही सामन्यात सूर्या शून्यावर बाद झाल्यानंतर त्याच्याविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये सूर्यकुमार यादव केवळ 3 बॉल खेळू शकला. सूर्याची ही खेळी फार दुर्दैवी आहे. मात्र हे कोणत्याही खेळाडूसोबत घडू शकतं.


रोहित शर्मा पुढे म्हणाला की, तो ज्या 3 बॉलवर आऊट झाला ते बॉल उत्कृष्ट होते. फलंदाजीला आल्यावर त्याने चुकीचे शॉट निवडले. मुख्य म्हणजे, आम्ही सूर्याला ओळखतो आणि तो स्पिनरविरूद्ध चांगली फलंदाजी करतो. म्हणूनच आम्ही त्याला नंतर फलंदाजीची संधी दिली, ज्यामुळे तो खुलेपणाने खेळू शकेल.


सूर्यासारखी परिस्थिती कोणत्याही खेळाडूवर उद्भवू शकते. सूर्याकडे क्वॉलिटी आणि क्षमता य दोन्ही गोष्टी तो एका खराब काळातून जातोय, असंही रोहित शर्मा म्हणालाय.


गोल्डन डकची हॅट्रिक


सूर्यकुमार सध्या टी-20 मध्ये नंबर 1 फलंदाज आहे. सूर्याची कामगिरी पाहता वनडे टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. यासाठीच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजमध्ये त्याला संधी दिली गेली. अनुक्रमे पहिल्या सामन्यात पहिल्याच बॉलवर शून्य, दुसऱ्या सामन्यात देखील पहिल्याच बॉलवर शून्य आणि हेच तिसऱ्या सामन्यात देखील तो शून्यावर बाद झाला.