Live मॅच सुरु असताना Rohit Sharma च्या नाकातून रक्तस्राव; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला.
गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 2nd T20) हा दुसरा T20 सामना भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी संकटापेक्षा कमी नव्हता. या सामन्यात त्याला दुखापतीचा सामना करावा लागला. याशिवाय या सामन्यात रोहित शर्माच्या नाकाला दुखापत झाल्याने काही ओव्हरसाठी मैदानाबाहेर राहावं लागलं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला.
Rohit Sharma च्या नाकातून रक्तस्राव
दक्षिण आफ्रिका टीमच्या फलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नाकातून रक्त येऊ लागल्याचं कॅमेरात कैद झालं. याचा व्हिडीयो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या नाकातून अचानक रक्त येऊ लागलं, त्यानंतर दिनेश कार्तिक त्याच्याकडे धावला.
यावेळी कार्तिकने डगआउटमध्ये बसलेल्या मेडिकल टीमला बोलवून घेतलं. दरम्यान, रोहितने हर्षल पटेलला त्याच्या ओव्हरदरम्यान फील्ड प्लेसमेंटबद्दल सांगितलं आणि तो डगआउटच्या दिशेने निघाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने काही ओव्हर मैदानात टीम इंडियाची कमान सांभाळली.
फलंदाजीदरम्यान रोहितला दुखापत
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली. रोहित शर्मा आणि के.एल राहुल फलंदाजी करत असताना रोहितच्या बोटाला दुखापत झाली होती.
टीम इंडियाचा विजय
गुवाहाटीधील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेला सामना भारतासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला. हा सामना जिंकून टीमने दक्षिण आफ्रिकेला घरच्या टी20 मालिकेत प्रथमच पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेचा केलेला 16 रन्सचा पराभव ऐतिहासिक मानला जाणार आहे.
सूर्यकुमारची तुफान खेळी
फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळी खेळली. मैदानावर येताच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 22 बॉलमध्ये 61 रनची तुफानी खेळी केली.