Rohit Sharma on Yuvraj Singh:  येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप (ICC World Cup 2023) सुरू होत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून टीम इंडियाला (Team India) एक चिंता सतावत आहे, ती म्हणजे... टीममधील चौथ्या क्रमांकाची जागा! युवराज सिंहनंतर 4 थ्या क्रमांकावर कोणत्याही खेळाडूला टिकून राहता आलं नाही. त्यावर आता रोहित शर्माने जाहीर वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या एन्ट्रीनंतर हा प्रश्न तसाच राहिला. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी कॅप्टन रोहित शर्माची इच्छा आहे. 'युवराजनंतर तसा सक्षम आणि तगडा खेळाडू मिळाला नाही. खेळाडूंना दुखापत होऊनही वनडेमध्ये नंबर-4 चा पर्याय शोधणं आमच्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे', असं रोहित शर्मा म्हणाला आहे. पीटीआयशी बोलताना रोहित शर्माला युवराज सिंगची (Rohit Sharma on Yuvraj Singh) आठवण आलीये.


Asia Cup 2023: भारताच्या जर्सीवर 'पाकिस्तान'चं नाव; वाचा काय आहे कारण?


वर्ल्ड कपविषयी युवराज काय म्हणतो?


मी भारतीय असलो तरी मी भारतच वर्ल्ड कप जिंकेल, असं म्हणू शकत नाही. त्यावरून मी फक्त देशभक्त आहे, हे सिद्ध होतंय. मात्र, तुम्हाला सत्य परिस्थिती पडताळून पहावी लागेल, असंही युवराज सिंह म्हणाला होता. टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत. जे टीमला एकहाती विजय मिळवून देऊ शकतात. रोहित दडपणाखाली खूप समजूतदार कॅप्टन आहे. तुमच्या अनुभवी कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे, असं म्हणत युवीने (Yuvraj Singh) नाराजी व्यक्त केली होती.


वर्ल्ड कप तोंडावर असताना BCCI चं पितळ उघडं, देशातील 'या' मोठ्या स्टेडियमला आग!


दरम्यान, गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा (Tilak Varma) याचं नाव घेतलं जातंय. युवराज सारख्या आक्रमक अंदाजात तिलक वर्माने डेब्यू केला. पहिल्या दोन बॉलवर दोन सिक्स खेचत वर्माने आपल्या आगमनाचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) देखील 4 थ्या क्रमाकांसाठी दंड थोपटून तयार आहेत. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय.