Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या घरात पुन्हा आनंदाचे क्षण आले आहेत. दुसऱ्यांदा रोहित शर्मा बाबा झाला असून त्याची पत्नी रीतिका सजदेह हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधीच भारताच्या कर्णधाराच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. रोहित शर्माला पहिली मुलगी असून तिचं नाव समायरा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टेस्ट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तिथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गंत पाच टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. पहिला सामना 22 नोव्हेंबर रोजी पर्थमध्ये खेळला जाणार आहे. रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता घरात बाळाचे आगमन झाल्यानंतर तो पर्थ टेस्टमध्ये खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


दरम्यान, रोहित शर्मा सध्या भारतातच आहे. तर, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. तर सर्वांनी पर्थमध्ये वाका स्टेडियममध्ये सराव करण्यासही सुरूवात केली आहे. रोहित शर्माची पत्नी रीतिकाने शुक्रवारी मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळं रोहित लवकरच ऑस्ट्रेलियाला जाऊन सामना खेळू शकतो, असं बोललं जात आहे. 


रितीका गरोदर आहे याची तसूभरही माहिती रोहितने कोणाला लागू दिली नव्हती. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नसल्याने सुनील गावस्कर यांनी त्याच्यावर टीका केली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अॅरोन फिंच यांनी मत व्यक्त केलं होतं. मी सुवील गावस्कर यांच्या मताशी असहमत आहे. रोहित शर्मा भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार आहेत. जर त्याची गरज घराला अधिक आहे कारण त्यांची पत्नी गर्भवती आहे. तो एक सुंदर क्षण आहे. आणि तुम्ही यासाठी कितीही वेळ घेऊ शकता. यानंतर रीतिका सजदेहने अॅरॉन फिंचच्या अधिकृत इन्स्टाग्रॅम हँडलला टॅग करत सॅल्युट असलेला इमोजी पोस्ट केला होता. रितीकाच्या या पोस्टनंतर रोहित बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. 


केएल राहुलदेखील बाबा बनणार 


भारतीय टीमचा स्टार प्लेअर केएल राहुलच्या घरीही लवकरच गुडन्यूज येणार आहे. केएल राहुल बाबा बनणार आहे. अलीकडेच राहुलची पत्नी आणि अभिनेत्री आथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवरुन ही खुशखबरी दिली आहे.