मुंबई : आयपीएलचा अकरावा सीझन सुरु व्हायला आणखी बरेच महिने बाकी आहेत. २७ आणि २८ जानेवारीला आयपीएल खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लिलावाआधी आयपीएल टीमना जुने खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी होती. त्यानुसार आरसीबीनं विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि सरफराज खानला कायम ठेवलं तर चेन्नईनं धोनी, रैना आणि जडेजाला टीममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या टीममध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला कायम ठेवण्यात आलं.


या सगळ्या रिटेन्शनमध्ये रोहित शर्मानं मात्र मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी त्याचा दिलदारपणा दाखवून दिला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार कायम ठेवण्यात आलेल्या पहिल्या खेळाडूला कमीत कमी १५ कोटी रुपये द्यावे लागणार होते. रोहित शर्मानंही मुंबईकडून खेळण्यासाठी १५ कोटी रुपयेच मानधन घेण्याचं मान्य केलं.


तर दुसरीकडे आरसीबीला विराट कोहलीला कायम ठेवण्यासाठी १७ कोटी रुपये मोजावे लागले. त्यामुळे रोहित शर्मानंही १७ कोटी रुपयांची मागणी केली असती तर मुंबई इंडियन्सच्या टीमला लिलावामध्ये २ कोटी रुपये कमी खर्च करता आले असते.


टॉप १० महागडे खेळाडू


विराट कोहली- १७ कोटी रुपये


एम.एस.धोनी- १५ कोटी रुपये


रोहित शर्मा- १५ कोटी रुपये


डेव्हिड वॉर्नर- १२.५ कोटी रुपये


स्टिव स्मिथ- १२ कोटी रुपये


सुरेश रैना- ११ कोटी रुपये


एबी डिव्हिलियर्स- ११ कोटी रुपये


हार्दिक पांड्या- ११ कोटी रुपये


सुनील नारायण- ८.५ कोटी रुपये


भुवनेश्वर कुमार- ८.५ कोटी रुपये


टीमनी कायम ठेवले हे खेळाडू


मुंबई : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या


चेन्नई : धोनी, रैना, जडेजा


बंगलोर : कोहली, एबी डिव्हिलियर्स, सरफराज


दिल्ली : मॉरिस, पंत, अय्यर


कोलकाता : सुनिल नारायण, आंद्रे रसेल


हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार


राजस्थान : स्टिव्ह स्मिथ


पंजाब : अक्सर पटेल