मुंबई : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहे. रोहित शर्माही देखील त्या टीमचा एक भाग आहे. रोहित शर्मा हा व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये भारताचा उपकर्णधार आहे. असे असले तरी सध्या इंग्लंड दौर्‍यामध्ये रोहितची भूमिका ही, कसोटी संघातील फर्स्ट चॉइस ओपनरची आहे. भारत आणि इंग्लंडमधील 5 कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. WTC Final खेळल्यानंतर भारतीय खेळाडू सध्या ब्रेकवर आहेत. या ब्रेकदरम्यान रोहित शर्माने लोणावळ्यातील आपली मालमत्ता विकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितचे लोणावळामध्ये आलिशान घर होते. रोहितचे हे घर सुमारे 6259 चौरस फूट भागात पसरलेले आहे. हे घर विकण्यासाठी 29 मे 2021 रोजी अधिकृतपणे करार झाला आहे.


रोहितचे लोणावळा मधील हे आलिशान घर सुषमा अशोक सराफ नावाच्या व्यक्तीने खरेदी केले आहे. ही प्रॉपर्टी त्यांनी 5 कोटी 25 लाख रुपयांमध्ये खरेदी केली. बरेच क्रिकेटर्स गुंतवणूकीसाठी घरं विकत घेतात, जेथे ते आपल्या कुटूंबियांसोबत काही वेळ देखील घालवतात.


त्याचप्रमाणे रोहित शर्मानेही गुंतवणूक करण्यासाठी लोणावळा येथे घर विकत घेतले होते, जे त्याने आता विकले आहे. रोहितने हे घर का विकले? यामागचे खरं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घराशी संबंधीत फक्त हे घर विकत घेतलेल्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे, त्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


रोहित शर्मा सध्या इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यात व्यस्त आहे. सुट्टीनंतर तो नॉटिंघम येथे टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये सामील होईल, जेथे  4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध तयारी सुरू केली जाईल. टीम इंडियाच्या कसोटी संघात रोहित शर्माची भूमिका सलामीवीराची आहे. म्हणजे प्रथम इंग्लंडच्या गोलंदाजांना रोखून ठेवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे.


इंग्लंडच्या संघाची आपल्या घरीच्या मैदानावर पकड मजबूत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मासह संपूर्ण टीम इंडियाला लवकरच या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.


इंग्लंडच्या संघात अँडरसन, ब्रॉड, बेन स्टोक्स सारखे खेळाडू असतील जे त्यांच्या मैदानात भारतीय फलंदाजांची कठोर परीक्षा घेताना दिसतील.