Rohit Sharma : एशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात झाली असून स्पर्धेतील तिसरा सामना हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तान यांच्यात रंगला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने ( Rohit sharma ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय टीम इंडियासाठी जास्त फायदेशीर ठरलेला दिसला नाही. अशात दोन वेळा पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. दरम्यान याचवेळी रोहित शर्माचं ( Rohit sharma ) एँग्री लूक पुन्हा एकदा व्हायरल झालंय. यावेळी पावसामुळे झालेल्या ब्रेकमध्ये रोहित शर्मा कॅमेरामॅनवर चांगलाच संतापलेला दिसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी होतोय. या हायव्होल्टेज मॅचकडे भारताच्या नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माने ( Rohit sharma ) कॅमेरामनला त्याचा व्हिडिओ बनवण्यास मनाई करताना दिसतोय.


पावसाच्या ब्रेक दरम्यान कॅमेरामन रोहित शर्माचा ( Rohit sharma ) व्हिडिओ काढताना दिसत होता. मात्र यावेळी रोहित शर्मा त्या कॅमेरामॅनवर चांगलात संतापलेला दिसला. यावेळी हिटमॅनने नाराजीच्या स्वरात कॅमेरामनला त्याचे शूटींग करण्यापासून थांबवलं. दरम्यान याचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 



पाकिस्तानविरूद्ध कर्णधार रोहित शर्मा फेल


एशिया कपच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माची ( Rohit sharma ) बॅट फेल झालीये. पाकिस्तानविरूद्ध रोहित शर्माला शाहीनने पहिल्या दोन बॉलवर आऊटस्विंग करत जात्यात घेतलं. त्यानंतर एक इनस्विंग बॉलवर शाहीनने रोहितची विकेट काढली. रोहितला काही कळण्याच्या आत शाहीनने बॅट आणि पॅटच्या मधून दांड्या उडवल्या. यावेळी रोहितला या हायव्होल्टेज सामन्यात अवघ्या 11 रन्सवर माघारी परतावं लागलं आहे.


पाहा दोन्ही टीम्सची Playing XI


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह


पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह.