Rohit Sharma: यंदाची आयपीएल सुरूवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अनेक बदल झाल्याचं दिसून आलं. यावेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याकडे टीमची कॅप्टन्सी सोपवली. यावेळी मॅनेजमेंटचा हा निर्णय चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. इतकंच नाही तर यावेळी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांमध्येही पुरेसा आपलेपणा दिसून आला नाही. अशातच आता मुंबईच्या टीममध्ये दोन गट पडल्याचं म्हटलं जातंय.


मुंबई इंडियन्समध्ये पडले 2 गट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स दोन गटात विभागलेली दिसत असल्याचा दावा करण्यात येतोय. हार्दिकचे कर्णधारपदही धोक्यात असल्याचं मानलं जातंय. त्याची रणनीती सपशेल अपयशी ठरताना दिसतेय. मुंबईच्या टीमने यावेळी सलग दोन सामने गमावले आहेत. हार्दिक पांड्याचे वरिष्ठ खेळाडूंसोबतचे ट्यूनिंगही चांगलं दिसत नाही. विशेषत: माजी कर्णधार रोहित शर्मासोबत त्याचे संबंध अजिबात सौहार्दाचे दिसत नसल्याचं व्हिडीओ देखील समोर आलेत. अशातच एका रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडल्याचं दिसून येतंय.


दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सने ज्या प्रकारे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे टीमची धुरा सोपवली आहे, त्यानुसार, या दोन्ही खेळाडूंच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांच्यासह काही खेळाडू आता रोहित शर्माच्या गटात असल्याचा दावा केला जातोय. याशिवाय हार्दिक पांड्याला इशान किशनसह टीमच्या मालकांचा खुला पाठिंबा दिसून येतोय.


याशिवाय कोचिंग स्टाफही विभागलेला दिसून येत असून हार्दिक पांड्याचे किरॉन पोलार्डसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध कोणापासूनही लपलेले नाहीत, तर त्याने गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाला खुर्चीवरून हटवून स्वत: बसवल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. 


अंबानी परिवाराचा बॅक सपोर्ट


अशा परिस्थितीत हार्दिक पंड्याला अंबानी कुटुंबाकडून उघडपणे पाठिंबा मिळताना दिसतोय. गेल्या काही सामन्यांमधून त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित होतोय. जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ गोलंदाजासोबत पहिल्या सामन्यात तो स्वत: गोलंदाजी करताना दिसला आणि दुसऱ्या सामन्यात त्याने 17 वर्षांच्या अननुभवी आणि नवोदित गोलंदाजाला संधी दिली. पांड्याच्या निर्णयाचे परिणाम टीम भोगत होती.