मुंबई : श्रीलंके विरूद्धच्या वन डे सीरिजमध्ये भारताने सलग आठव्यांदा विजयी कामगिरी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या एकदिवसीय मालिकांमध्ये रोहित शर्माने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. पण या जबाबदारीसोबत त्याला साजिशी कामगिरीदेखील केली आहे.  


धडाकेबाज फलंदाजी 


मोहाली मधील वन डे मॅचमध्ये रोहितने दुहेरी शतक झळकावले, विशाखापट्टणम येथील मॅचमध्ये  रोहितने षटकारांची शंभरी साजरी केली. त्यानंतर आता रोहितसाठी अजून एक गोड बातमी आली आहे. 


आयसीसीचे रॅंकिंग 


आयसीसी  मीडियाने जाहीर केलेल्या अहवालानुसार रोहित शर्माने पहिल्यांदा ८०० मार्कसचा टप्पा ओलांडला आहे. नव्या यादीनुसार रोहित शर्मा ८१६ गुणांसह पाचव्या स्थानी आला आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रोहित आयसीसीच्या यादीत तिसर्‍या स्थानी होता. ते रोहितच्या करियरमधील सर्वोत्तम रॅंकिंग होते.  


सोमवारी रॅंकिंग जाहीर होण्यापूर्वी रोहित सातव्या स्थानी होता.  


इतर कोणत्या खेळाडूंचे  रॅंकिंग सुधारले ? 


भारतीय गोलंदाजांमध्ये युवेंद्र चहाल हा २३ व्या स्थानी आला आहे. कुलदीप यादव हा १६ स्थानं वर म्हणजेच त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम अशा ५६ व्या स्थानी आला आहे. तर हार्दिक पांड्या देखील त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम म्हणजे ४५ व्या स्थानी आला आहे.