धर्मशाला : वेस्ट इंडिजनंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा देखील धुव्वा उडवला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला 3-0 असा क्लिन स्विप दिला आहे. दरम्यान या सामन्यात टॉस दरम्यान असं काही बोलून गेला की, त्याने तातडीने, मला फार सांभाळून बोललं पाहिजे असं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा जेव्हा टॉसच्या वेळी बोलत होता. तेव्हा कॉमेंट्रेटर मुरली कार्तिकने त्याला विचारलं की, सामन्यासाठी टीममध्ये किती बदल केले आहेत?. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, इशान किशन दुखापतीमुळे ही मॅच मिस करणार आहे. तर याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलदेखील गेम मिस करणार आहेत.


हे वाक्य बोलताच कर्णधार रोहित शर्माने स्वतःच्या वाक्यात सुधारणा केली. यापुढे रोहित म्हणाला, नाही नाही, या सर्वांना आराम देण्यात आला आहे. मी काय बोलतोय. मला जरा सांभाळून बोलावं लागेल. यानंतर लगेच मुरली कार्तिक आणि रोहित शर्मा जोरजोरात हसू लागले.


रोहित शर्माचा गंमतीशीर अंदाज प्रत्येकाला माहिती आहे. अनेकदा प्रेस कॉन्फरन्समध्येही जेव्हा ते येतात तेव्हा वातावरण मजेशीर असतं. रोहित शर्माचे अनेक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


टीम इंडियाने (Team India) विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 3rd T20I) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने लंका दहन केलं आहे. टीम इंडियाने या विजयासह श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. टीम इंडियाने 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली आहे.