मुंबई : क्रिकेट जगतात खेळाडूंची तुलना खूप सामान्य आहे. चाहते आणि तज्ज्ञ अनेकदा फलंदाज, कर्णधार किंवा गोलंदाज यांच्यात तुलना करतात. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटनेही भारताच्या रोहित शर्माची तुलना करत मोठं विधान केलंय. भारतीय कर्णधाराचे कौतुक करताना बटने त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सशी केली आहे, पण त्याचबरोबर त्याने रोहितच्या फिटनेसबद्दलही एक मोठी गोष्ट सांगितलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या टीम इंडियाच्या कर्णधाराची प्रशंसा करताना सलमान बट म्हणाला की, रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा अर्धा जरी फिट असता तर महान एबी डिव्हिलियर्सच्या बरोबरीने झाला असता. विराट कोहली हा क्रिकेट खेळणाऱ्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे."


बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानी जोडीशी रोहितची तुलना करताना बटने मात्र टाळलं. सलमान बट्ट त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “रोहितची तुलना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानशी केलेली नाही. त्याचं कौशल्य पाहता रोहितचा फिटनेस कोहलीच्या तुलनेत निम्मा असला तरी त्याच्यापेक्षा धोकादायक खेळाडू दुसरा नाही. मग फक्त एबी डिव्हिलियर्सशी त्याचा सामना होईल. जर रोहित कोहलीसारखा फिट असता तर त्याने काय केलं असतं हे मला माहीत नाही.”


ICC T20 क्रमवारीत बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या दोन अव्वल स्थानांवर कब्जा केलाय. त्याचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली 14व्या आणि 29व्या स्थानावर आहेत. रोहित शर्मा हा वनडे क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक मानला जातो. सलामीवीर म्हणून हिटमॅनने टी-20 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत.


रोहित शर्मा आगामी ICC T20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. भारत 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.