Rohit Sharma : फलंदाजीदरम्यान ईशानवर का वैतागला रोहित? ओव्हर संपण्यापूर्वीच केला डाव घोषित!
Rohit Sharma : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( WI vs IND ) या सामन्यात अखेर तिसऱ्या दिवशी विजय मिळवला. डॉमिनिका टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) धक्कादायक खुलासा केलाय.
Rohit Sharma : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( WI vs IND ) या सामन्यात अखेर तिसऱ्या दिवशी विजय मिळवला. या सामन्यात एक इनिंग आणि 141 रन्सने भारताने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने ( Team India ) पहिला डाव 421 रन्सवर घोषित केला होता. यावेळी डेब्यू करणारा इशान किशन फलंदाजी करत असताना कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) त्याच्यावर संतापलेला दिसला. दरम्यान यामागे काय कारण होतं, याचा खुलासा अखेर सामन्यानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma ) केलाय.
डॉमिनिका टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) धक्कादायक खुलासा केलाय. रोहितने सांगितलं की, तो ड्रेसिंग रूममधून इशान किशनला ( Ishan Kishan ) लवकरात लवकर पहिला रन घेण्यासाठी सांगत होता. जेणेकरून तो डाव घोषित करू शकेल.
रोहित शर्माला ( Rohit Sharma ) असं वाटत होतं की, इशान किशनची ही पहिलीच टेस्ट मॅच होती. त्यामुळेच त्याने आधी रन काढावा अशी रोहितची इच्छा होती. त्याने रन घेतल्यानंतर रोहितला डाव घोषित करायचा होता.
का संतापला रोहित शर्मा?
टीम इंडियाकडून इशान किशन सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याला 19 बॉल्समध्ये एकंही रन करता आला नाही. यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) ड्रेसिंग रूममधून संतापाने हातवारे करताना दिसला. अखेर 20 व्या बॉलवरवर ईशानने रन काढला आणि लगेचच रोहित शर्माने ( Rohit Sharma ) डाव घोषित केला.
'त्याने खातं उघडावं अशी माझी इच्छा'
रोहित शर्मा म्हणाला की, मी इशान किशनला सांगत होतो की एका ओव्हरमध्ये आपण डाव घोषित करणारआहोत. मला ईशान किशनने खातं उघडावं म्हणजेच एखादा रन काढावा अशी इच्छा होती. मात्र त्याने 15-20 बॉल्सपर्यंत एकही रन घेतला नाही.
मला त्याला सांगायचे होतं की, त्याने पहिला टेस्ट रन करावा जेणेकरून आम्ही डाव घोषित करू शकू. मी समजू शकतो की, जेव्हा तुम्ही तुमचा पहिला टेस्ट सामना खेळता तेव्हा तुमच्या मनात खूप अस्वस्थता असते. ईशान किशन दिवसभर ड्रेसिंग रूममध्ये बसून होता आणि त्याला फलंदाजीसाठी उतरायचं. त्याच्याकडे पाहून मला त्याची परिस्थिती समजत होती. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की, एक किंवा दोन ओव्हरनंतर आपण डाव घोषित करू.