Rohit Sharma Future after IPL auction 2024: नुकतंच दुबईमध्ये इंडियन प्रिमीयर लीगचं मिनी ऑक्शन झालं. या ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमने हार्दिक पंड्याला ट्रेडिंगद्वारे आपल्या ताफ्यात घेतलं. इतकंच नाही तर त्याच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. रोहित शर्माला बाजूला सारून हार्दिक पंड्याला कर्णधार करण्याचा निर्णय चाहत्यांना फारसा रूचलेला नाही. दरम्यान यानंतर रोहित शर्मा मुंबईची टीम सोडून दुसऱ्या टीमकडून खेळणार असल्याच्या चर्चा रंगल्या. अखेर यावर आता फ्रेंचायझींनी मौन सोडलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा पुढचा सिझन मार्च आणि मे महिन्यात खेळवला जाण्याची शक्यता आहे. मात्र या सिझनपूर्वी रोहित शर्माचं नाव फार चर्चेत आहे. आता ट्रेड विंडोदरम्यान रोहित मुंबईची टीम सोडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही चाहते आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटलं जातंय की, रोहित ट्रेड विंडो अंतर्गत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) टीममध्ये सामील होऊ शकतो.


रोहित शर्मासंदर्भात चेन्नईच्या फ्रेंचायझीचं मोठं विधान


गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये सामील होऊ शकतो, अशा बातम्या समोर आल्या होत्या. महेंद्रसिंग धोनी चेन्नई टीमचं नेतृत्व करतोय. पण या सर्व गोष्टी चेन्नई फ्रेंचयाझीने फेटाळून लावल्या आहेत. फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी लिलावाच्या वेळी सांगितलं की, रोहितला आम्ही टीममध्ये घेण्याच्या मूडमध्ये नाही. या सर्व बातम्या अफवा आहेत.


विश्वनाथन पुढे म्हणाले की, आम्ही खेळाडूंचा व्यापार करणार नाहीये. आमच्याकडे मुंबई इंडियन्ससोबत ट्रेड करण्यासाठी खेळाडू नाहीत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि आमचा हेतूही नाही.


रोहित, सूर्या आणि बुमराह मुंबईटी टीम सोडणार नाही


काही दिवसांपूर्वी क्रिकबझनेही रोहितबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. मुंबई इंडियन्सशी संबंधित एका अधिकाऱ्याचा हवाला देत त्यांनी लिहिलंय की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत मीडियामध्ये चुकीच्या बातम्या येत आहेत. हे खेळाडू कुठेही जात नसून मुंबईची टीम या सर्व खेळाडूंना सोबत ठेवणार आहे.


या अधिकाऱ्याने असंही सांगितले की, हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व खेळाडूंची संमती घेण्यात आली होती. या सर्वांमध्ये स्वतः रोहितचाही समावेश होता. त्यामुळे पसरवल्या जात असलेल्या या गोष्टी चुकीच्या आहेत.