मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे दोन मोठे खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील मतभेद अनेकदा दिसून आलेत. आयसीसी टी -20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी भारतीय टीमने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसरा सराव सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून आलेला रोहित मैदानावर उतरला होता. मात्र मैदानावर उतरताच मात्र त्याची फजिती झालेली दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी -20 वर्ल्डकपपूर्वी सराव सामन्यात जेव्हा भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरला, तेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी रोहितच्या हातात देण्यात आली होती. तो अरॉन फिंचसह टॉससाठी आला. टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोहितने सांगितलं की, त्याच्या संघातील तीन मोठ्या खेळाडूंना या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. 


रोहित म्हणाला, कोहली, बुमराह आणि शमी या सामन्यात खेळत नाहीत. मात्र आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की जेव्हा टीम इंडिया मैदानावर उतरली तेव्हा विराट देखील बाकीच्या खेळाडूंसह रोहितच्या अगदी मागे मैदानावर पोहोचला. हे दृश्य पाहताच सर्वांच्या भुवया उंचावल्या.



विराटमुळे झाली रोहितची फजेती


टॉस करताना रोहितने स्पष्टपणे सांगितले होते की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात विराटला विश्रांती देण्यात आली आहे. रोहितने कर्णधार म्हणून टॉस करताना जे काही सांगितले ते त्याने टीमच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतरच सांगितलं असणार. 


विराटला या सामन्यात खेळण्याची गरज नव्हती हे स्पष्ट आहे. सर्वांसमोर, रोहितने विराट विश्रांती घेणार असल्याचे जाहीर केलं, पण पुन्हा सर्वांच्या मागे फिल्डिंग लावून त्याने रोहितची फजिती केली. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी विराटबद्दल राग काढून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.