नवी दिल्ली : रोहित शर्माच्या कॅप्टनशिपखाली भारताने दूसऱ्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये यश प्राप्त केले. रोहित शर्माने सांगितले की, होलकर स्टेडियममध्ये फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती होती. भारताने फक्त रोहितच्या ११८ आणि राहुलच्या ८९ धावांच्या मदतीने २६० धावा केल्या. यात फक्त भारताला ५ विकेट्स गमवाव्या लागल्या. मात्र १७२ धावात भारताने श्रीलंकेला ऑलआऊट केले. याच मैदानावर रोहितने टी20 चे सर्वात वेगवान शतक साकारले.


रोहितने केला खुलासा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दमदार खेळीसोबत रोहितने एका खास गोष्टीचा खुलासा केला. त्याच्या या दमदार खेळीचे गुपीत त्याने उलघडले. रोहितचे टी20 मधील हे दूसरे शतक होते. असे शतक करणारा रोहित हा पहिला खेळाडू आहे.


 लकी चार्म


रोहितने शतक केल्यानंतर इंस्टाग्रामवर रितिकासोबतचा सेल्फी पोस्ट केला आणि लिहीले, "ही माझी लकी चार्म आहे."



रितिकाची उपस्थिती


सामना पाहण्यासाठी रितिका आली होती. त्याचबरोबर त्याने श्रीलंकेविरूद्ध वनडे सिरीजमध्ये शतक झळकवले तेव्हाही रितिका तेथे उपस्थित होती.



रोहित म्हणाला...


सामन्यानंतर रोहित म्हणाला की, मॅचमध्ये फलंदाजीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. मी लाईनवर येऊन बॉल हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी सफल झालो.