मुंबई : मुंबईने कोलकाताचा ५ मे ला झालेल्या सामन्यात ९ विकेटने पराभव केला. या पराभवासह कोलकाताचे प्ले-ऑफमधील आव्हान संपुष्टात आले. मुंबईच्या विजयात कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने मोलाची भूमिका बजावली. रोहितने नॉटआऊट अर्धशतकी खेळी केली. मुंबईच्या या विजयानंतर अंकतालिकेत मुंबई पहिल्या क्रमांकावर पोहचली. मुंबईच्या विजयानंतर रोहितने मुंबईच्या विजयाचे रहस्य उलगडले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसाठी साखळी फेरीतील शेवटचा टप्पा फार महत्वाचा होता. मुंबईची यंदाच्या पर्वातील सुरुवात ही अडखळत झाली होती. यानंतर मात्र मुंबईने पुनरागमन करत प्लेऑफसाठी प्रवेश केला. रोहितला या वक्तव्यातून आम्ही कशाप्रकारे पुनरागमन केले ही बाब सूचित करायची होती.


कोलकाता विरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना 5 मे ला खेळण्यात आला. मुंबईने कोलकाताचा 9 विकटने पराभव केला. मुंबईने या विजयासह क्रमवारीत पहिले स्थान गाठले. काही मॅचआधी मुंबईला प्ले-ऑफसाठी संघर्ष करावा लागला होता. मुंबईने अशी कामगिरी करायची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील मुंबईने अडखळत सुरुवात करत प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. 'आयपीएलच्या साखळी फेरीतील दुसरा टप्पा फार महत्वाचा असतो. आम्ही या टप्प्यात नेहमीच मुंबईने चांगली कामगिरी केली असल्याचे रोहितने मॅचनंतर म्हटलं आहे.


आयपीएलमध्ये कोणीही कोणाला पराभूत करु शकतो. आम्ही सावधरित्या खेळून पुढे जाऊ इच्छित असल्याचे रोहित म्हणाला. प्ले-ऑफमधील पहिली क्वालीफायर मुंबई-चेन्नई यांच्यात होणार आहे. चेन्नई या पर्वाच्या सुरुवातीपासून पहिल्या क्रमांकावर होती. परंतु मुंबई चांगल्या नेट रनरेटमुळे पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई आणि दिल्ली १८ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.


रोहितने आपल्या विजयाचे श्रेय हे संपूर्ण टीमला दिले आहे. 'आम्ही या पर्वातील जिंकलेल्या मॅच या टीमच्या कामगिरीवर जिंकलोत. आम्ही कोणत्या एका खेळाडूवर निर्भर नव्हतो. विजयाची आवश्यकता असताना प्रत्येकाने निर्णायक खेळी करत विजय मिळवून दिला'. असे रोहित म्हणाला.


हार्दिक काय म्हणाला ?


मुंबई क्वालिफायर फेरीत चेन्न्ईविरुद्ध खेळणार आहे. चेन्नई विरुद्ध खेळताना वेगळ्याच प्रकारचे आव्हान असते. ही मॅच फार रोमांचक होणार असल्याचे हार्दिक म्हणाला. आम्ही चांगली कामगिरी करुन फायनलमध्ये पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे हार्दिकने म्हटलं आहे.