Roston Chase stunning catch to dismiss Tilak Varma: कॅप्टन हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या टी-ट्वेंटी सिरीजमध्ये टीम इंडियाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. वेस्ट इंजिडने शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात भारताचा 8 गडी राखून पराभव केला अन् सामन्यासह मालिका देखील खिशात घातली. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या ब्रँडन किंगने (Brandon King) धमाकेदार 84 धावांची खेळी करत कॅरेबियन ताकद दाखवून दिली. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर अडचणी निर्माण केल्या. तर फिल्डिंग देखील कौतुकास्पद होती. याची प्रिचिती देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वात जास्त प्रभावित केलं ते तिलक वर्मा या युवा खेळाडूने. तिलक वर्माने (Tilak Varma) दमदार कामगिरी करत सूर्यकुमार यादवला मोलाची साथ दिली होती. त्यानंतर त्याने जे भल्या भल्या गोलंदाजांना जमलं नाही, ते करून दाखवलं. निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग फलंदाजी करत असताना तिलक वर्माने पुरनची विकेट काढली. जे कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमत नव्हतं. या सामन्यात तिलक वर्मा आणखी धारदार गोलंदाजी करू शकत होता. मात्र,  रोस्टन चेसच्या एका अविश्वनीय कॅचने सामन्याचं पारडं फिरवलं.


सूर्यकुमार आणि तिलकची चांगली भागेदारी सुरू होती. त्यावेळी त्याने आक्रमण चालू केलं. त्यावेळी ऑफस्पिनर रोस्टन चेस (Roston Chase) गोलंदाजीसाठी आला. त्याने अप्रतिम गोलंदाजी करत घेतला. त्यामुळे तिलक वर्मा कॅट अँड बोल्ड झाला.  ब्रँडन किंगने चार फूट लांब उडी मारत त्याने कॅच घेतला... जणू काही चित्त्यापेक्षा सुपरफास्ट... त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्याच्या या भन्नाट कॅचमुळे त्याचं कौतुक देखील होताना दिसतंय.


पाहा Video




दरम्यान, तिलक वर्माने टी-ट्वेंटी सामन्यात दमदार प्रदर्शन केलं. त्यामुळे आता त्याला आशिया कप स्पर्धेत खेळवण्याची शक्यता आहे. आगामी आशिया कप स्पर्धेत त्याने चांगली खेळी केली तर त्याची आगामी वर्ल्ड कप संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तिलक वर्माने पाचव्या सामन्यात ऑलराऊंडर कामगिरीचं प्रदर्शन करत संघातील 4 थ्या क्रमांकावर दावा ठोकला आहे.