मुंबई : २००७ साली धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आरपी सिंगनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ३२ वर्षांचा फास्ट बॉलर असलेल्या आरपीनं ट्विटरवरून संन्यास घेत असल्याची माहिती दिली आहे. ४ सप्टेंबर २००५ ला आरपी सिंग पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. यानंतर बरोबर १३ वर्षांनी म्हणजेच ४ सप्टेंबर २००५ ला आरपी सिंगनं निवृत्ती घेतली. आरपी सिंगनं ६ वर्ष भारताकडून ८२ मॅच खेळल्या आणि १०० विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ४ सप्टेंबर २००५ला मी पहिल्यांदाच भारताची जर्सी घातली होती, असं म्हणत आरपी सिंगनं ट्विटरवर भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आरपी सिंगनं त्याचं कुटुंब, बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघाला धन्यवाद दिले आहेत. माझा आत्मा आणि मन आजही त्या तरुण मुलासोबत आहे, ज्यानं पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याला लेदर बॉलला हातात घेऊन फक्त खेळायचं होतं. पण शरीरानं वय झाल्याचं सांगितलं. आता युवा खेळाडूंसाठी जागा खाली करण्याची वेळ आली आहे, असं ट्विट आरपी सिंगनं केलं आहे.


आरपी सिंगची क्रिकेट कारकिर्द


टेस्ट क्रिकेटमध्ये आरपी सिंगनं १४ मॅच खेळल्या ज्यामध्ये त्याला ४० विकेट मिळाल्या. एका इनिंगमध्ये ५९ रनवर ५ विकेट घेण्याची सर्वोत्तम कामगिरी आरपीनं केली होती. तर वनडेमध्ये आरपी सिंगनं ५८ मॅचमध्ये ६९ विकेट घेतल्या. वनडेमध्ये ३५ रन देऊन ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. १० टी-२० मॅचमध्ये  आरपीनं १५ विकेट घेतल्या. टी-२० मध्ये १३ रनवर ४ विकेट ही आरपीची सर्वोत्तम कामगिरी होती.