RR vs DC : आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वात लोकप्रिय लीग आहे. यात क्रिकेटर्स फक्त क्रिकेट खेळण्यासाठी नाही तर लोकांचे मनोरंजन करण्यासाठीही मैदानावर उतरतात. असाच एक मनोरंजक प्रकार हा आयपीएल 2024 च्या 9 व्या मॅचमध्ये घडलेला आहे, ज्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघं संघात चित्तवेधक मॅच चालू असतानाच खलील अहमदच्या बॉलिंगवर एक LBW ची अपील झाली, पण ही अपील अंपायरनं नाकारली होती. यानंतर ऋषभ पंत आणि खलील अहमद यांच्यात डिआरएस घेण्याबद्दल संवाद झाला आणि या संवादाची व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. 


खलील करत होता DRS ची मागणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RR vs DC च्या मॅचमध्ये राजस्थान बॅटिंग करत असताना इनिंगच्या 15 व्या ओव्हरमध्ये ध्रुव जुरेल मैदानावर बॅटिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर खलीलचा बॉल जुरेलच्या पॅडवर जाऊन धडकला यानंतर संपूर्ण दिल्लीच्या टीमने जोरदार अपील केली, पण अंपायरने ती अपील नाकारली होती. पण खलीलला वाटले की हा बॉल सरळ पॅडवर लागला आहे, त्यामुळे त्याने ऋषभ पंत सोबत संवाद साधून ऋषभला DRS घ्यायला भाग पाडले पण, ऋषभचे मानने होते की बॉल पहिले पॅडला न लागता बॅटला लागलेला आहे. यामुळे दोघं खेळाडूंमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. 



खलील अहमद आणि ऋषभ पंतचा विनोदी संवाद



खलील अहमद बॉलिंग करत असताना ध्रुव जुरेलच्या पॅडवर बॉल जाऊन धडकला यानंतर, ऋषभ पंतकडे येऊन खलील हा कॅप्टनवर डिआरएस घेण्यासाठी प्रेशर बनवत होता, खलील ऋषभला बोलतो की, 'ले-ले भाई, ले-ले, लास्ट है... यावर ऋषभ खलीलला सांगतो की, 'ये तो तू बताएगा ना कि बॅट है या  नहीं.' दोघं खेळाडूंमधला हा संवाद ऐकून कमेंटेटर्स पण हसू लागतात. 


या विनोदी घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. पण येवढे प्रयत्न करून सूद्धा ऋषभ हा डिआरएस घेत नाही आणि हा निर्णय बरोबर निघतो आणि नंतर समजतं की पडते की, बॉल हा पहिले जूरेलच्या बॅटला लागून मग पॅडला लागला होता. 


28 मार्चला झालेल्या DC vs RR च्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करायला लागला आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केले होत. यामध्ये राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 185 धावा केल्या होत्या पण बदल्यामध्ये दिल्ली फक्त 173 धावाच बनवू शकले होते.