Ruturaj Gaikwad in Vijay Hazare Trophy 2022 : विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाडने कमाल करून दाखवली आहे. ऋतुराज गायकवाडने डबल सेंच्यूरी नंतर आता दीड शतक खेळी केली आहे. ऋतुराजने 125 बॉलमध्ये 168 धावांची तुफानी खेळी केली आहे. आसाम विरूद्ध त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्या या खेळीची आता क्रिकेट वर्तुळाच चर्चा आहे. 


हे ही वाचा : क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का! 'या' टीममधील14 खेळाडूंना व्हायरसची लागण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 आसामविरूद्ध आक्रमक खेळी


ऋतुराज गायकवाड ने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा वादळी खेळी केली आहे.आसामविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 125 बॉलमध्ये 168 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 18 फोर आणि 6 सिक्स ठोकले आहेत. ऋतुराजची डबल सेंच्यूरी हुकली असली तरी त्याच्या खेळीने क्रिकेट फॅन्सची मने जिंकली आहेत. ऋतुराजने 133.33 च्या स्ट्राईक रेटने धावा करत धमाका केला आहे. त्याने 88 बॉलमध्ये शतक पूर्ण केले होते. त्याच्या या खेळीची पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 


उत्तर प्रदेशविरूद्ध डबल सेंच्यूरी


दरम्यान याआधी विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या (Vijay Hazare Trophy 2022) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विरुद्धच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) द्विशतक ठोकले होते.गायकवाडने 159 बॉलमध्ये 220 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 सिक्सर मारले होते. तसेच याच सामन्यात त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले होते. अशी कामगिरी करून त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. 


आसामसमोर इतक्या धावांचे आव्हान 


ऋतुराज गायकवाडच्या दीड शतकी आणि अंकित बावणेच्या शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने 7 विकेट गमावून 350 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता आसामसमोर 351 धावांचे आव्हान असणार आहे. आता हे आव्हान आसाम पुर्ण करतो की महाराष्ट्र त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतो, हे पाहावे लागणार आहे. 


दरम्यान विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात गायकवाडने 9 डावात बॅटींग केली आहे. ज्यामध्ये त्याने 6 डावात सेंच्यूरी आणि एका डावात द्विशतक झळकावलं आहे. त्याने या स्पर्धेत अशी कामगिरी करून सिलेक्टर्सच लक्ष पुन्हा वेधले आहे.