PAK vs ENG : इंग्लंड आणि पाकिस्तान (pakistan vs england) यांच्यात उद्या 1 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेआधी मोठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाच्या (England cricket team) 14 खेळाडूंना 'अज्ञात व्हायरस'ची लागण झाली आहे. हा व्हायरस कोरोना नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंडने 15 खेळाडूंना तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानला (Pakistan) पाठवले होते. यापैकी जवळपास निम्मे खेळाडू अज्ञात संसर्गाने ग्रस्त आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससह (ben stoke virus) टीमचे एकूण 14 सदस्य अज्ञात व्हायरसचे बळी ठरले आहेत.सध्या या खेळाडूंना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान या कसोटी मालिकेच्या एक दिवस आधीच इंग्लंड (England cricket team) संघाची स्थिती इतकी वाईट झाली होती की, केवळ 5 खेळाडूच सराव सत्रात सहभागी झाले होते. बाकी इतर खेळाडू आजारी असल्याने विश्रांती घेत होते.
इंग्लंडच्या (England) खेळाडूंना नेमका कोणत्या विषाणूचा संसर्ग झाला आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. तो कोरोना किंवा इतर कोणताही अज्ञात विषाणू असू शकतो, अशी माहीती आहे.
दरम्यान रावळपिंडीतील कसोटी सामन्याच्या एक दिवस आधीच 14 खेळाडू व्हायरसचे शिकार झाल्याने आता पहिला कसोटी सामना कसा होणार ? तसेच सामना रद्द होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.
पाकिस्तान टीम: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, आगा सलमान, अझहर अली, फहीम अश्रफ, हारिस रौफ, इमाम-उल-हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, नौमान अली, सरफराज अहमद, सौद शकील, शान मसूद आणि जाहिद मेहमूद.
इंग्लंड टीम: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स (विकेटकीपर), विल जॅक्स, कीटन जेनिंग्ज, जॅक लीच, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, रेहान अहमद, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.