मुंबई : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर तिसऱ्या टी-20 सामन्यात 180 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने धमाकेदार अर्धशतक झळकावलं आणि समोरच्या टीमच्या गोलंदाजाची चांगलीच दमछाक केली. दरम्यान, गायकवाडने एनरिक नोर्खियावरच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. मात्र यादरम्यान ऋतुराज गायकवाड थोडक्यात बचावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने 35 बॉलमध्ये 57 रन्स केले. ऋतुराजने 7 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान, ऋतुराजची फलंदाजी पाहून नोर्खिया ​​संतापला आणि त्याने गायकवाडला एक धोकादायक बाऊन्सर फेकला.


भारतीय पॉवरप्लेच्या 5 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. गायकवाडने नोर्खियाच्या पहिल्या दोन बॉल्सवर दोन चौकार मारले होते. यानंतर नॉर्खिया चांगलाच भडकला होता. अशा परिस्थितीत पुढचा बॉल त्याने बाऊंसर फेकला आणि गायकवाड थोडक्यात बचावला. 


वेगाने येणारा हा बॉल ऋतुराजला खेळता आला नाही. हा बॉल प्रथम त्याच्या हेल्मेटवर आदळला आणि नंतर बॅटची कट लावगून तो चौकार गेला. 



टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव 19.1 ओव्हरमध्येच 131 धावांवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेतील आव्हान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे.