Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या वादळी खेळीने देशभर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची क्रीडा वर्तुळात चर्चा रंगली आहे. पठ्ठ्याने कामगिरीही तशी केली आहे. उत्तर प्रदेशविरूद्धच्या सामन्यामध्ये शिवा सिंह या स्पीनरला त्याने सलग सात षटकार ठोकले आहेत. ऋतुराजचं सर्वत्र कौतुक होत असताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Ruturaj gaikwad on ms dhoni csk captain hit 7 six one over latets marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिंकलो किंवा हरलो तर संघातील वातावरण शांत राहील याची काळजी धोनीने घेतली. काहीवेळा पराभवानंतर संघात गट पडलेले पाहायला मिळतात किंवा तयार होतात मात्र सीएसकेमध्ये असं होत नाही. सामना हारला तरी धोनी माघारी आल्यावर सर्वांना मित्रांनो आराम करा हे होत राहतं असं म्हणत संघातील वातावरण संंतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ऋतुराजचं सांगितलं. 


महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीमध्ये खेळानेच नाहीतर मैदानात प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वत:ला शांत ठेवत आपली वेगळी छाप पाडली आहे. धोनीला कॅप्टन कूलही म्हणूनही ओळखलं जातं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात धोनीच्या नेतृत्वाखाली ऋतुराज गायकवाड खेळतो. धोनीही युवा खेळाडूंना संधी देतो आणि काहीच दिवसात ते खेळाडू जबरदस्त प्रदर्शन करताना दिसतात.  


दरम्यान, आयपीएलच्या एका पर्वात ऋतुराज सुरूवातीला फ्लॉप जात होता. मात्र धोनीने त्याच्यावरचा विश्वास काही ढळू दिला नाही. त्यानंतर अखेरच्या सामन्यांमध्ये ऋतुराजने सलग अर्धशतके मारत त्याची उपयुक्तता दाखवून दिली होती. आजच्या सामन्यात तर ऋतुराजचं वादळ आलेलं दिसलं. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऋतुराजने 220 रन्सची नाबाद खेळी केली.