नवी दिल्ली :  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स आणि पाकिस्तानचा बाबर आझम सध्याच्या घडीला वन डेमधील सर्वोत्कृष्ठ फलंदाज आहेत. पण या सर्वांना एका नेदरलँडच्या फलंदाजाने मागे टाकले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल... तर हे खऱं आहे. नेदरलँडचा हा फलंदाज सध्या वन डे क्रिकेटमध्ये सरासरीच्या बाबतीत या तिघा खेळाडूंच्या पुढे आहे. 


सर्वाधिक सरासरी...


नेदरलँडच्या या खेळाडूचे नाव रायन टेनर्डकाटे... रायनची वनडेतील सरासरी ६७ प्रति सामना आहे. रायन हा एक ऑलराउंडर खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने ३३ वन डे खेळल्या आहेत. त्यात ६७च्या सरासरीने १५४१ धावा काढल्या आहेत. 


दिग्गजांना टाकले मागे...


३३ वन डेमध्ये रायनने आतापर्यंत ५ शतक आणि ९ अर्धशतक झळकावले आहेत. त्यामुळे आपल्या शानदार सरासरीने त्याने विराट कोहली, बाबर आझम आणि एबी डिव्हिलिअर्स आणि मायकल बेवन यांना मागे टाकले आहे. 


बाबरचा दुसरा क्रमांक...


वन डेमध्ये सरासरीच्या बाबतीत पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. २३ वर्षाच्या बाबरने ३६ वन डे सामन्यात ५८.६० च्या सरासरीने १७५८ धावा केल्या त्यात सात शतक आणि सात अर्धशतक सामील आहेत. 


विराटची सरासरी सरसच...


भारताच्या विराट कोहलीने सर्वाधिक वन डे सामने खेळले आहेत. तरी त्याची ५५ पेक्षा अधिक सरासरी आहे.  त्याने २०२ सामन्यात ५५.७४ च्या सरासरीने ९०३० धावा केल्या आहेत. यात ३२ शतक आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. 


डिव्हिलिअर्सने दर्जा कायम ठेवला...


दक्षिण आफ्रिकेच्या ३३ वर्षीय डिव्हिलिअर्सने २०० पेक्षा अधिक वन डे सामने खेळले आहेत. यात २२५ सामन्यात ५४.०६च्या सरासरीने ९५१५ धावा केल्या आहेत. त्यात २५ शतक आणि ५३ अर्धशतकांचा समावेश आहे. 


रायन आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सचा सदस्य होता.