India vs South Africa : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात येत्या 14 डिसेंबरला अखेरचा टी-ट्वेंटी सामना (SA vs IND 3rd T20) खेळवला जाणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळला. तर आता तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागलंय. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाची चव चाखावी लागली होती. अशातच आता दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जी चूक केली, ती चूक आता तिसऱ्या सामन्यात सूर्या करणार नाही. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार चार हुकमी खेळाडूंना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. सूर्याचे हे मॅचविनर खेळाडू कोण? जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी मोठी चूक केली. दुसऱ्या सामन्यात सलामीवीर दोन्ही फलंदाज शुन्यावर बाद झाले. स्टार शुभमन गिलला (Shubhman Gill) देखील मैदानात टिकता आलं नाही. तर यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) देखील शुन्यावर बाद झाला होता. त्यामुळे आता आगामी सामन्यात सूर्या सलामीवीर जोडी बदलू शकतो. संघात ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) एन्ट्री होणार का? असा सवाल विचारला जातोय. तर दुसरीकडे रिंकू सिंहनंतर टीमनंतर एका फिनिशरची संघाला गरज होती. त्यामुळे सूर्या अनुभवी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyar) संघात सामील करेल, अशी शक्यता देखील आहे.


गोलंदाजीमध्ये कमी स्कोर असताना टीम इंडियाला झटपट विकेट्सची गरज होती. त्यावेळी मुकेश कुमार वगळता सूर्या कोणावरही विश्वास दाखवू शकत नव्हता. त्यामुळे आता अखेरच्या सामन्यात स्पिनर रवी बिश्नोई (Ravi Bishoni) याच्यावर विश्वास दाखवू शकतो. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रवी बिश्नोई याची कामगिरी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरु शकते. तर अर्शदीप सिंगच्या जागेवर दीपक चहरला (Deepak Chahar) संधी दिली जाणार की नाही? असा सवाल देखील विचारला जात आहे.


आणखी वाचा - IND vs SA 2nd T20: सूर्यकुमार यादवने केली किंग कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी, बाबर आझम थोडक्यात हुकला!


तीन टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.