बाप रे! फलंदाजी करताना बॅटच तुटली, व्हिडीओ व्हायरल
चेंडू टोलवताच बॅटचे 2 तुकडे, सामन्यादरम्यान अजब प्रकार, व्हिडीओ व्हायरल
मुंबई: सामन्यामध्ये काहीवेळा अपघात किंवा छोट्या दुर्घटना होत असल्याचे ऐकलं असेल. पण भर मैदानात फलंदाजी करताना अचानक बॅट तुटल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
साऊथ अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान जोहान्सबर्ग इथे दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान अजब प्रकार घडला. पाकिस्तानच्या गोलंदाजानं फेकलेल्या चेंडूनं दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजाची बॅट तुटली आणि मैदानात खळबळ उडाली. दोन मिनिटं गोंधळ निर्माण झाला. बॅटचे दोन तुकडे झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दक्षिण अफ्रिकेच्या 16 व्या ओव्हरदरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजानं चेंडू फेकला. हा चेंडू टोलवण्यासाठी फलंदाजानं बॅट पुढे केली. चेंडू बॅटवर बसला आणि बॅटचे तुकडे झाले. द. अफ्रिका संघाचा कर्णधार बावउमा सोबत ही घटना घडली आहे.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा आफ्रिकेचा कर्णधार बावउमा 6 धावांवर खेळत होता. बॅट तुटल्यानंतर त्याने नवीन बॅट घेतली. नव्या बॅटनं त्याने 86 धावा केल्या. कर्णधाराच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सामन्यात 6 गडी राखून 341 धावा केल्या. या वन डे सीरिजमध्ये दोन्ही संघांनी बरोबरी साधली आहे.