पर्थ : T20 World Cup टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 मध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहेत. रविवारी पाकिस्तान आणि टीम इंडियात ( India vs Pakistan) शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना गेला होता. त्यानंतर आज नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यातील सामना देखील शेवटच्या बॉलपर्यत पोहोचला होता. त्यात आता एका स्टार खेळाडूने मैदानात आतषबाजी केल्याची घटना घडलीय. या खेळाडूची आतषबाजी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा असणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : ...म्हणून विराटला चेस मास्टर म्हणतात, त्याचे मैदानावरचे आकडेच सांगतात 


टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेत (south africa vs zimbabwe) सामना पार पाडला. या सामन्याच्या सुरुवातीला पाऊस पडल्याने सामना केवळ 9 ओव्हर्सचाच रंगला होता. या सामन्यात स्टार खेळाडूने पाऊस पडल्यानंतर धावांचा पाऊस पाडला होता.त्यामुळे या खेळाडूची चर्चा रंगली आहे.   


कोण आहे 'हा' स्टार खेळाडू? 


दक्षिण आफ्रिकेचा (south africa) सलामीवीर क्विंटन डी कॉकची (quinton de cock) बॅट चांगलीच तळपली आहे. डी कॉकने सामन्याच्या पहिल्याच ओव्हरपासून आक्रमक खेळी करायला सुरूवात केली. डी कॉकने एका ओव्हरमध्ये 4 फोर आणि सिक्स मारला आहेत. तर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक रन काढला आहे. त्यामुळे त्याने 6 बॉलमध्ये 23 धावा ठोकल्या होत्या.  


कसा रंगला सामना? 


9 ओव्हरर्सच्या या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत 80 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण डी कॉकच्या (quinton de cock) झंझावातासमोर सगळंच उद्ध्वस्त ठरलं. डी कॉकने क्रीझवर येताच आक्रमक धावा काढल्या. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने हॅट्ट्रीक 3 फोर मारले. नंतर एक गगनचुंबी सिक्स ठोकला. त्यानंतर त्याने पाचव्या बॉलवर पुन्हा फोर मारला. आणि शेवटच्या बॉलवर एक रन काढले.  


हे ही वाचा : अर्शदीप सिंह मैदानात असताना आई काय करते? जाणून घ्या 


दरम्यान डी कॉक (quinton de cock) इथेच थांबला नाही, पुढच्या ओव्हरमध्येही त्याचे आक्रमण सुरूच राहिले. त्याने 18 बॉलमध्ये 47 धावा ठोकल्या. त्याने 261.11 च्या स्ट्राईक रेटने 8 फोर आणि 1 सिक्स मारला आहे.  


धावांची आतषबाजी करून सुद्धा सामना हरले 


क्विंटन डी कॉकने (quinton de cock) धावांची आतषबाजी करूनसुद्धा दक्षिण आफ्रिकेला (south africa) सामना जिंकता आला नाही. दक्षिण आफ्रिकेला 9 ओव्हरमध्ये 81 धावा करायच्या होत्या. मात्र पुन्हा पाऊस पडल्याने सामना 7 ओव्हरचा करून 64 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या क्विंटन डी कॉक आणि बावूमाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. क्विंटन डी कॉकने तुफानी खेळी करत 18 बॉलमध्ये 47 धावा ठोकल्या. फक्त 3 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 51 धावा केल्या होत्या. पुढच्या 4 ओव्हरमध्ये म्हणजेच 24 बॉलमध्ये फक्त त्यांना 13 धावा करायच्या होत्या. एक वेळ अस वाटत होते की सामना दक्षिण आफ्रिका जिंकेल मात्र झिम्बाब्वेच्या मदतीला पाऊस धावून आला. या पावसामुळे सामनाच रद्द झाला. 


क्विंटन डी कॉकची (quinton de cock) आतषबाजी पाहून इतर संघाना मोठा धक्काच बसला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा (south africa) पुढील सामना येत्या 30 ऑक्टोबरला टीम इंडियाशी असणार आहे.त्यामुळे क्विंटन डी कॉक टीम इंडियासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.