मुंबई: सामन्या दरम्यान अनेकदा अंपायरच्या निर्णयावरून वाद होत असल्याचं पाहायला मिळत. असाच एक वाद चर्चेचा विषय ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत घडलेला हा किस्सा सर्वात जास्त चर्चेत आला. ICCच्या एलीट अंपायरच्या पॅनलमध्ये राहिलेल्या डार्ल हार्पर यांनी पुन्हा एकदा त्या घटनेची आठवण करून दिली. सचिन तेंडुलकरला LBW आऊट देण्याच्या निर्णयावर खूप वाद निर्माण झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1999 एडिलेड कसोटी सामन्या दरम्यान सचिनने मॅक्ग्राचा शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आऊट होऊ नये आणि बॉल मारण्याच्या नादात सचिन खाली बसला होता. त्यावेळी त्याच्या खांद्याला बॉल लागला. त्यानंतर अंपायरने सचिनला LBW आऊट देण्यात आलं. त्यावेळी या निर्णयावरून वाद झाला आणि ऑस्ट्रेलिया संघाने निर्णयासाठी अपील केलं. 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला हार्पर यांनी आऊट दिलं होतं. या घटनेनंतर हार्परला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. मी माझा निर्णय तो आजही आठवतो.  त्या निर्णयावरून मला खूप मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.


तर आय़सीसीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी हे नोट केलं नव्हतं. पण त्यावेळी एमएसके प्रसाद  त्या सामन्यात भारताकडून विकेटकीपिंग करत होते. त्यांनी मला म्हटलं सचिन मला म्हणाला होता की तो आऊट आहे. त्यावेळी मलाही तेच वाटत होतं असं स्पष्टीकरण हार्परने दिलं.