मुंबई : टीम इंडिया 2 एप्रिल 2011 ला दुसऱ्यांदा वनडे क्रिकेटमध्ये विश्वविजेता (ICC World Cup) ठरली. या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही (Sachin Tendulkar) समावेश होता. प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता. आज या विजयाचा 10 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने सचिनने एक ट्विट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, 'तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांबद्दल धन्यवाद. डॉक्टरांचा सल्ला आणि खबरदारी घेत मी रुग्णालयात दाखल झालो. मी काही दिवसांत घरी परत जाईन. स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. विश्वचषक जिंकण्याच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व भारतीय आणि माझ्या सहकारी खेळाडूंचे अभिनंदन. असेही त्याने पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हटले.



मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण, काळजी घेण्याच्या दृष्टीने तो आता रुग्णालयात दाखल झाला आहे. शुक्रवारी सचिनने ट्विटरच्या माध्यमातून स्वतः याची माहिती दिली.


27 मार्चला तेंडुलकरने स्वतः कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तो घरातचा आयजोलेशनमध्ये होता.पण, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.सचिनने नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज चॅलेंज या वेट्रन्स स्पर्धेत सहभाग नोंदवला होता आणि संघाच्या जेतेपदात आपले योगदान दिले होते. 



रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती देण्यासोबत त्याने 2011 विश्वचषक जेतेपदाच्या आठवणीना उजाळा देत शुभेच्छा दिल्या. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली 2 एप्रिल 2011 मध्ये विश्वचषक जिंकला होता.