Sachin Tendulkar's Message For Son Arjun Tendulkar: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडूलकरने (Arjun Tendulkar) आज आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जुनला संधी देण्यात आली होती. या सामन्यात पहिल्या हाफमध्ये त्याने 2 ओव्हर केल्या. या 2 ओव्हरमध्ये त्याने 17 धावा दिल्या. मात्र, पहिल्या सामन्यात त्याला विकेट मिळवता आली नाही. अशातच आता सचिन तेंडूलकरने आपल्या लाडक्या लेकासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे.


काय म्हणाला Sachin Tendulkar ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस. एक बाप म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्या खेळाबद्दल पॅशिनेट आहे. मला माहित आहे की, तु खेळाला योग्य तो आदर देत राहशील आणि खेळ तुझ्यावर देखील प्रेम करत राहील, असं सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) पोस्ट करत म्हणतो.


आणखी वाचा - Arjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत!


तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तु हे काम कायम करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट, असं म्हणत सचिनने अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याचं कौतूक करत त्याला भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


पाहा Tweet - 



मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माकडून (Rohit Sharma) अर्जुनला डेब्यू कॅप देण्यात आली. डेब्यूच्या सामन्यात अर्जुनला केवळ 2 ओव्हर फेकण्याची संधी मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये अर्जुनने केवळ 5 रन्स दिले. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 12 रन्स खर्च केले. तर भावाला सपोर्ट करण्यासाठी बहीण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती.


दरम्यान, अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं होतं. त्यामुळे आज सर्वत्र अर्जुन तेंडूलकरच्या डेब्यूची चर्चा दिसत आहे.